कराड/प्रतिनिधी : –
परीट समाज सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून प्रकाश जाधव हे गेली १४ वर्षे काम पाहत आहेत. त्यांनी या काळात समाजासाठी परीट दिलेल्या बहुमूल्य योगदानामुळे त्यांची महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी म्हणून निवड करण्यात आली आहे. परिट समाजाचे नूतन प्रदेशाध्यक्ष खंडेराव कडलग यांनी ही निवड केली.
कार्याची दखल : सातारा जिल्ह्यातून समाजाचे काम राज्य पातळीवर दखलपात्र झाले असून प्रत्येक कार्यामध्ये स्वतःला झोकून देऊन प्रकाश जाधव यांनी काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली.
समाजासाठी काम करणार : यावेळी प्रकाश जाधव म्हणाले, प्रदेशाध्यक्ष खंडेराव कडलग, माजी प्रदेशाध्यक्ष राजेंद्रशेठ खैरनार, राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, कार्याध्यक्ष सनथ वाढाई (गोंदिया), प्रदेश महासचिव सुनील फंड (अहिल्यानगर), सहसचिव रवींद्र कणेकर (कोकण), सहसचिव रवींद्र अंदुरेकर (अकोला), कोषाध्यक्ष सुधीर पाटोळे (पुणे) यांनी माझ्यावर विश्वास दाखवत प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली आहे. त्या विश्वासात पात्र राहून यापुढेही समाजासाठी काम करणार आहे.
मान्यवरांकडून अभिनंदन : या निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील तसेच परीट समाज बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले.
