श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., कराड, शाखा साताराचा सहावा वर्धापनदिन मंगळवार (दि. २२) रोजी पार पडला. यानिमित्त सातारा शाखेचे सल्लागार औदुंबर कासार यांच्या हस्ते संस्थेच्या सातारा शाखेच्या प्रवेशद्वाराजवळ वृक्षारोपन करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी संस्थेचे कुटुंबप्रमुख मुनीर बागवान (सावकार), व्हा. चेअरमन अनिल सोनवणे, डॉ. संतोष मोहिरे, संजीव मोहिरे, सुरेश कोळेकर, श्रीमती जयाराणी-जाधव, संतोष भामरे, मारुती सावंत, आशुतोष जाधव, नंदीनी भामरे, आनंदराव कुंभार, डॉ. रविंद्र भारती झुटींग, शाखा प्रमुख, सेवक वर्ग, सभासद, ठेवीदार, हितचिंतक उपस्थित होते.
शुभेच्छांचा वर्षाव : वर्धापन दिनानिमित्त सहाय्यक अधिकारी जे. पी. शिंदे, सहकारी अधिकारी किर्ती पाटणे, सहकारी अधिकारी नितीन सुपेकर, सांख्यिकिक सहाय्यक वीर मॅडम, लेखापरिक्षक विभाग अधिकारी विनायक टंकसाळे, क्रिडा संघटक प्रमोद चतुर, जिल्हा अधिकारी चषक क्रिकेट स्पर्धेचे अध्यक्ष प्रकाश घाडगे व सहकारी यांनी उपस्थित राहून संस्थेस शुभेच्छा दिल्या.
उपक्रमाचे कौतुक : संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करत सातारा हरित समुहाचे कन्हैयालाल राजपुरोहित यांनी वृक्षांच्या संरक्षणासाठी दोन ट्री गार्ड संस्थेस भेट दिले. तसेच हरित साताराच्या वतीने संस्थेच्या वृक्षारोपण उपक्रमासचे कौतुक केले. यावेळी निसर्गप्रेमी भालचंद्र गोताड उपस्थित होते.
संस्थेच्या कार्याचा आढावा : याप्रसंगी बोलताना संस्थेचे कुटुंबप्रमुख मुनीर बागवान (सावकार) यांनी श्री कालिकादेवी पतसंस्था मर्यादित, कराड संस्थेने सन २०२४-२५ मध्ये २९२ कोटींच्या पुढे एकत्रित व्यवसाय करीत १५१ कोटी ८१ लाख ठेवी पुर्ण केल्या आहेत. यामध्ये सातारा शाखेच्या ठेवी ८ कोटी ६६ लाखांच्या पुढे असल्याचे त्यांनी सांगितले.
योगदान व सहकार्य : संस्थेचे माजी व्हा. चेअरमन स्व. जयवंतराव जाधव, चेअरमन राजन वेळापुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक वेळापुरे, संचालक मंडळ यांचे मोठे योगदान व सहकार्य लाभल्याने संस्थेने ग्राहकांचा विश्वास संपादन करुन यशस्वी प्रगती केली आहे. संस्थेचे निव्वळ एनपीए प्रमाण शुन्य टक्के राखण्यात यश मिळाले आहे. तसेच कर्ज थकबाकीही अत्यंत अल्प प्रमाणात असून संस्थेला ३ कोटी २१ लाखांचा निव्वळ नफा झाला असल्याचेही कुटुंबप्रमुख मुनीर बागवान यावेळी सांगितले.
अद्यावत सुविधा : संस्थेने स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांच्या माध्यमातुन ई-पेमेंटद्वारे स्टॅम्प फी, रजिस्टर फी, GST, इंन्कमटॅक्स, व्हॅट, टी.डी.एस., DHC, सर्च फी अशा सुविधांच्या बरोबर RTGS / NEFT शासकीय व ट्रेझरी चलने भरणे, तसेच कराड व सातारा येथे स्वमालकीच्या वास्तु, अत्याधुनिक संगणक CBS सिस्टीम, लॉकर या सुविधा ग्राहकांना उपलब्ध करुन दिल्या आहेत.
संविधांमधील सातत्यात अमूल्य योगदान : या सुविधा सभासदांपर्यंत अखंडीतपणे चालू ठेवण्याचे मोठे संस्थेचे गेली ३६ वर्षे सेवा करणारे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक वेळापुरे यांचे अमूल्य योगदान असल्याचे गौरवोद्गारही कुटुंबप्रमुख मुनीर बागवान यांनी यावेळी काढले.