कोयना सहकारी बँकेस १८४ लाखांचा नफा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

नुकत्याच संपलेल्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात कोयना सहकारी बँकेची सांपतिक स्थिती भक्कम झाली असून बँकेचा नफा १८४ लाख आणि तरतुदी व कर वजा जाता बँकेस ९०.२१ लाखांचा निव्वळ नफा झाला आहे. तर भागभांडवल ७.४३ कोटी, निधी १६.४४ कोटी, ठेवी १८२.६८ कोटी, कर्ज १२८.३६ कोटी, सीआरए आर १६.२० टक्के आहे. बँकेचा निव्वळ एनपीए २.१९ टक्के, तर एकूण व्यसाय ३११ कोटी झाला असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष रोहित पाटील यांनी दिली.

प्रधान कार्यालय, कराड

तीन जिल्ह्यांत कार्यक्षेत्र : सन १९९६ साली कराड येथे सुरु झालेल्या कोयना सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र सातारा, सांगली व पुणे जिल्हा असून बँकेच्या एकूण १२ शाखा कार्यरत आहे. बँकेचे सुसज्ज स्वमालकीची मुख्य कार्यालय इमारत आहे.

आरबीआयच्या निकषांची पूर्तता : बॅंकेचे मार्गदर्शक व माजी सहकार मंत्री स्व. विलासकाका पाटील (उंडाळकर), तसेच संस्थापक अॅड. उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली व बँकेचे संचालक मंडळ यांनी निस्वार्थपणे, विश्वस्ताच्या भूमिकेतून काम करून आरबीआयच्या सर्व निकषांची पूर्तता केली आहे.

सातत्याने ‘अ’ ऑडीट वर्ग : कोयना बँक स्थापनेपासून नफ्यात आहे. बँकेस स्थापनेपासून सातत्याने ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला आहे. बँकेने ग्राहक सेवा व आधुनिक बँकिंग सुविधा देणेच्या हेतूने आय IMPS (मोबाईल बँकिंग) व UPI बँकिंगचा अवलंब केला आहे.

अत्याधुनिक सुविधा : ATM (डेबीटकार्ड), डिमांड ड्राफ्ट, RTGS/ NEFT/ ATM/ CTS क्लिअरिंग/ SMS, तसेच मिस्ड कॉल आदी सुविधा कार्यान्वित केल्या आहेत.

सर्व योजनांचा लाभ घ्या : बँक नेहमीच तत्पर सेवा देण्यास कटिबद्ध असून बँकेच्या ठेवी व कर्ज योजनांचा सभासद, खातेदारांनी लाभ घ्यावा, असे अवाहन बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील यांनी केले.

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!