कुटुंबप्रमुख मुनीर बागवान यांची माहिती; शून्य टक्के एनपीए, 3 कोटी 21 लाखांचा निव्वळ नफा
कराड/प्रतिनिधी : –
श्री कालिकादेवी पतसंस्था, मर्या; कराड या संस्थेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये २९२ कोटींच्या पुढे एकत्रित व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला असून १५१ कोटी ८१ लाख ठेवी पूर्ण केल्या असल्याची माहिती संस्थेचे कुटुंबप्रमुख मुनीर बागवान-सावकार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
तीन तपांची समृद्ध विकासाची अर्थपूर्ण वाटचाल : संस्थेचे संस्थापक कुटुंबजनक कै. गजानन (बाळासाहेब) बंडोबा मोहिरे, कै. जयंतीलाल भंडारी, कै. महेश त्रिभुवणे, संजीव मोहिरे यांनी लावलेले रोपटे आता तीन तपांची समृद्ध विकासाची अर्थपूर्ण वाटचाल पुर्ण करीत संस्थेने ही उपलब्धी मिळवली असल्याचेही कुटुंबप्रमुख श्री. बागवान यांनी सांगितले.

सहकार्य व योगदान : संस्थेच्या या एकूण वाटचालीत संस्थेचे माजी व्हा. चेअरमन स्व. जयवंतराव जाधव, संचालक मंडळ, चेअरमन राजन वेळापुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक वेळापुरे व सेवक वर्ग यांचे मोठे सहकार्य व योगदान लाभले आहे. यामुळे संस्थेने यशस्वी प्रगती केली आहे.
शुन्य टक्के एनपीए : संस्थेने निव्वळ एनपीए (NPA) चे प्रमाण शुन्य टक्के (०%) राखण्यात यश मिळविले आहे. तसेच कर्ज थकबाकीही अत्यंत अल्प प्रमाणात आहे. संस्थेला रुपये 3 कोटी 21 लाखांचा निव्वळ नफा झाला आहे.
“बँकिंग सेवेची मालिका श्री कालिका” : संस्था बँकिंग बरोबरच स्थापनेपासून सामाजिक कार्य करीत आपला वारसा जपत आली आहे. संस्था सभासदांना विविध सेवा-सुविधा नेट बँकिंगच्या माध्यमातून देऊन “बँकिंग सेवेची मालिका श्री कालिका” हे ब्रिद वाक्य पुर्ण करीत आहे.
स्वमालकीच्या अत्याधुनिक वास्तू : श्री कालिकादेवी पतसंस्थेच्या कराड शहराच्या मुख्य बाजारपेठेत व सातारा येथे राजपथ कमानी हौदासमोर गुरुवार पेठ, सातारा येथे स्वमालकीच्या अत्याधुनिक वास्तू आहेत.
अत्याधुनिक सेवा-सुविधा : यामध्ये लॉकर सुविधा, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांच्या माध्यमातुन ई-पेमेंटद्वारे स्टॅम्प फी, रजिस्टर फी, जीएसटी (GST), इंन्कमटॅक्स, व्हॅट, टी.डी.एस., डी.एच.सी., (DHC), सर्च फी अशा सुविधांच्या बरोबर आरटीजीएस (RTGS) / एनइएफटी (NEFT) शासकीय व ट्रेझरी चलने या सुविधा ग्राहकांना उपलब्ध करुन दिल्या आहेत.
सहकार्याची अपेक्षा : संस्थेस या आर्थिक वर्षात दिलेल्या अमुल्य सहकार्याबद्दल सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांचे आभारी आहोत. पुढील आर्थिक वर्षातदेखील असेच सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा संस्थेच्या सेवक वर्गाने व्यक्त केली आहे.
