‘श्री कालिकादेवी’ची शुभ मुहूर्तावर संकल्पपूर्ती 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

गुढीपाडवा आणि नूतन वर्षारंभास 151 कोटी ठेवींचा टप्पा पार 

कराड/प्रतिनिधी : – 

श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., कराड या संस्थेने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात १५१ कोटी ठेवी पार करण्याचा संकल्प केला होता. संस्थेने त्याची ३१ मार्च पूर्वीच गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या मुहुर्तावर संकल्पपूर्ती केली असल्याची माहिती संस्थेचे कुटुंबप्रमुख मुनीर बागवान (सावकार) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

कुटुंबप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल : संस्थेचे कुटुंबप्रमुख मुनीर बागवान (सावकार) यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने १५१ कोटींच्या ठेवींचा टप्पा पूर्ण केला आहे.

सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी : श्री कालिकादेवी पतसंस्थेने 151 कोटी ठेवींच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात भरीव अशी प्रगती केली आहे.

योगदान व मार्गदर्शन : या कामगिरीसाठी संस्थेचे चेअरमन राजन वेळापुरे व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक वेळापुरे यांचे मोठे योगदान व सहकार्य लाभले.

विविध सेवा-सुविधा : संस्थेने स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांच्या माध्यमातून ई-पेमेंट, डी.डी., अॅटपार चेक, मल्टिसिटी चेक्स या सुविधांबरोबर आरटीजीएस (RTGS) / एनइएफटी (NEFT) शासकीय व ट्रेझरी चलने भरणे या सुविधा ग्राहकांना उपलब्ध करुन दिल्या आहेत.

श्री वेळापुरे यांचे विशेष कौतुक : संस्थेच्या या विविध सेवा सुविधा सभासदांपर्यंत अखंडितपणे चालू ठेवण्याचे मोठे योगदान संस्थेचे गेली ३६ वर्षे सेवा करणारे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक वेळापुरे यांचे आहे. त्यामुळे श्री वेळापूर यांचे विशेष कौतुक होत आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!