दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्धल सन्मान; पोलीस पाटील विठ्ठल जाधव यांचे कार्य कौतुकास्पद – फुलारी
कराड/प्रतिनिधी : –
कोल्हापुरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्धल कालेटेक (ता. कराड) गावाचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील विठ्ठल तातोबा जाधव व त्यांचे बंधू प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष महेश जाधव यांनी पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचा सत्कार केला.
दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल सन्मान : पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्धल सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिललदार, कराड तालुका पोलीस ठाण्याचे महेंद्र जगताप यांनी कराड अर्बन बँकेच्या शताब्दी सभागृहात सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते.
सत्कार : या सोहळ्यात कालेटेकचे पोलीस पाटील विठ्ठल जाधव व त्यांचे बंधू महेश जाधव यांनी पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
मनस्वी आनंद : यावेळी पोलीस पाटील विठ्ठल तातोबा जाधव यांनी कोल्हापुरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक मिळाल्याने आमच्या पोलीस पाटलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांच्या वैचारिक वारसा असणाऱ्या कराडनगरीत पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचा भव्य दिव्य सत्कार करण्याचा आनंद आम्हाला लाभला, हे आमचे भाग्य असल्याचे मत व्यक्त केली.
पोलीस पाटील विठ्ठल जाधव यांचे कार्य कौतुकास्पद : विविध उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपण्याचे पोलीस पाटील विठ्ठल जाधव यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरोवोद्गार काढत आपला सत्कार केल्याबद्धल पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी पाटील बंधूंचे आभारही मानले.
कौतुकाची थाप : माणुसकी जपणारे, नाती निर्माण करणारे, लोकांविषयी ह्रदयभाव, आपुलकी जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे कालेटेकचे पोलीस पाटील विठ्ठल तातोबा जाधव होय. रोज येता जाता प्रत्येकाशी आपुलकीने बोलणारे, त्यांची आस्तेवाईकपणे चौकशी करणारे, प्रत्येकाच्या हाकेला ओ देणारे, सर्वांच्या मदतीला धावणारे पोलीस पाटील विठ्ठल जाधव कराड तालुक्यातील लोकप्रिय पोलीस पाटील म्हणून ओळखले जातात. त्यामुळे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिललदार, कराड तालुका पोलीस ठाण्याचे महेंद्र जगताप यांनीही वेळोवेळी पोलीस पाटील विठ्ठल जाधव यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे.
