कराड/प्रतिनिधी : –
सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कराड तालुकाध्यक्ष समाजभूषण दादासाहेब शिंगण यांना लायन्स क्लब कराड मेन यांच्यावतीने आदर्श लायन प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार वितरण समारंभ : शुक्रवार (दि. २१) फेब्रुवारी रोजी कराड येथे लायन्स क्लब कराड मेन यांचा पुरस्कार वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
मान्यवरांच्या हस्ते सन्मान : यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह सामाजिक क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीची दाखल घेत दादासाहेब शिंगण यांना लायन्स क्लबच्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व बारामतीचे मुख्य प्रांतपाल लायन्स एम. के. पाटील यांच्या हस्ते आदर्श लायन प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उपस्थित मान्यवर : यावेळी लायन्स क्लब कराड मेनचे अध्यक्ष संजय पवार, सेक्रेटरी मिलिंद भंडारे, खजिनदार प्रसाद नाईक, कराड लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मावजीभाई पटेल, सचिव खंडू इंगळे, डॉ. रमेश थोरात, डॉ. सतीश शिंदे, माजी प्रांतपाल सुनील सुतार (कोल्हापूर), अमृत वास्के, मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे, सर्व लायन्सचे पदाधिकारी उपस्थित होते.
अभिनंदन व शुभेच्छा : दादासाहेब शिंगण यांना आदर्श लायन प्रेरणा पुरस्कार मिळाल्याबद्धल प्रकाश वास्के व अमृत वास्के यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
