वारुंजीच्या सरपंचपदी सौ. अमृता पाटील यांची निवड

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, तसेच पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली, वारुंजी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. अमृता जितेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी, बाजार समितीचे माजी उपसभापती, संभाजी चव्हाण, उपसरपंच अनुज पाटील, माजी सरपंच महादेव पाटील, माजी सोसायटी चेअरमन, राजेंद्र पाटील, माजी सोसायटी चेअरमन बाळासाहेब पाटील, जगन्नाथ पाटील, सोसायटी चेअरमन गणेश पाटील, तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य, अशोक पाटील, संभाजी चव्हाण, इम्तियाज नदाफ, प्रशांत पाटील, सदस्या श्रीमती शकुंतला पवार, गीता पाटील, सौ. सुप्रिया पाटील, अनारकली पिंजारे, वैशाली भंडलकर, उज्वला भोसले, सविता लगाडे, श्रीमती शोभा चव्हाण, अॅड. शिवाजी पाटील, अॅड. नितीन पाटील, बाळासो पाटील, नानासो पाटील, मंगेश पाटील, जयवंत पाटील, विनायकराव पाटील, रणजीत पाटील, सागर पाटील, आनंदराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. नवनिर्वाचीत सरपंच सौ. अमृता पाटील यांचे सर्व उपस्थितांनी अभिनंदन केले.

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!