कराड/प्रतिनिधी : –
कराड येथील मोहम्मद रफी, लता मंगेशकर फॅन्स क्लबच्या वतीने स्व. लता मंगेशकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरूवार (दि. 6) फेब्रुवारी रोजी कराड येथे ‘मेरी आवाज ही पहचान है..’ या स्व. लता मंगेशकर यांच्या अजरामर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
टाऊन हॉल : स्व. यशवंतराव चव्हाण टाऊन हॉल कराड येथे सायंकाळी 6 वाजता कार्यक्रम होणार आहे.
मान्यवर : यावेळी माजी खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांची प्रमुख उपस्थिती आहे. पी. जे. पाटील ज्वेलर्स व कॅफे मॅजिक कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. कार्यक्रमाची संकल्पना महागुरू असिफ बागवान व मोहंमद अनिस यांची आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.