उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
कराड/प्रतिनिधी : –
रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत रस्ता सुरक्षितते संदर्भात जनमाणसामध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या हेतूने रस्ता सुरक्षा मॅरेथॉन (दौड) रविवार (दि. 9) फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी चैतन्य कणसे, सामाजिक कार्यकर्ते रणजीतनाना पाटील व अतुल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रारंभ : कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) व रणजीतनाना पाटील मित्र परिवार यांच्यावतीने ही मॅरेथॉन प्रायोजित करण्यात आली आहे. रविवारी सकाळी ७ वाजता लिबर्टी मजदूर मंडळ येथून मॅरेथॉनला प्रारंभ होणार आहे. स्पर्धेमध्ये जवळपास अडीच हजार स्पर्धकांचा सहभाग असणार आहे. नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
मॅरेथॉनचा मार्ग : या स्पर्धेचा मार्ग लिबर्टी मैदान, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमपासून सुरु होऊन विजय दिवस चौक, बसस्थानक, दत्त चौक, मुख्य बाजारपेठ, चावडी चौक, कन्या शाळा इथून पुढे कृष्ण नाकामार्गे कॉटेज हॉस्पिटल इथून पुढे विजय दिवस समारोह चौक व पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, लिबर्टी मैदान कराड येथे ही स्पर्धा संपेल.
दोन गटात स्पर्धा : ही स्पर्धा पुरुष व महिला अशा दोन गटात असेल. सदरच्या स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन रणजीत पाटील नाना मित्रपरिवार यांनी केले आहे.
या सुविधा मिळणार : या स्पर्धेमधील सर्व सहभागी खेळाडूंना टी-शर्ट, मेडल व नाश्ता दिला जाणार आहे. स्पर्धेच्या दिवशी सकाळी ५ ते ७ या वेळेत खेळाडूंना टी-शर्ट व नाश्ता दिला जाईल. त्यानंतर झुंबा सेशन होईल व मुख्य स्पर्धेत सुरुवात होईल.
पारितोषिक : या स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्या खेळाडूंना पारितोषिक देऊन गौरविले जाईल. या स्पर्धेसाठी शासकीय अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर सर्व खेळाडू, नागरिक सहभागी असणार आहेत.तरी सर्वांनी स्पर्धेच्या अगोदर एक दिवसापर्यंत आपली नाव नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन उपप्रादेशिक कार्यालय कराड व रणजीतनाना पाटील मित्र परिवार, कराड यांनी केले आहे.
नोंदणीसाठी संपर्क : या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणीसाठी संगम हेल्थ क्लब श्री मुरली वत्स (72 18 12 27 22), ए. पी. स्पोर्ट्स (97 66 32 38 78), आरटीओ ऑफिस योगेश कुंभार (97 30 63 21 14), लिबर्टी मजदूर मंडळ (96 0 49 48 584, 99 70 63 98 77), शिवराय प्रतिष्ठान (7522927555) येथे संपर्क करावा.
आमचे गुरुवर्य एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे कॉमन मॅन मुख्यमंत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे. त्यांचा वाढदिवस रस्ता सुरक्षा दौड पूर्ण करून साजरा करण्यात येणार आहे. खेळाडू, नागरिक व महिलांनी 9 फेब्रुवारीच्या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवावा.
– रणजीतनाना पाटील
