हर्षवर्धन मोहितेची दिल्लीतील प्रजासत्ताक परेडसाठी निवड

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : – 

महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. अंतर्गत सांगली येथील लेफ्टनंट जनरल एस.पी.पी. थोरात अकॅडमीमध्ये इयत्ता ९ वी मध्ये शिकणारा सार्जंट हर्षवर्धन जीवन मोहिते या कॅडेटची दि. २६ जानेवारी रोजीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे होणाऱ्या परेडसाठी निवड झाली आहे.

दहा कॅम्प पूर्ण : या परेडसाठी अतिशय कठीण कॅम्पमधून मोजक्याच कॅडेटची निवड केली जाते. गेल्या चार महिन्यांपासून त्याने आर.डी.सी. परेडसाठी आवश्यक असणारे कोल्हापूर येथील चार व पुणे येथील सहा, असे एकूण दहा कॅम्प पूर्ण केले असून दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या सांस्कृतिक विभागामध्ये त्याची निवड झाली आहे.

एकमेव कॅडेट : कोल्हापूर एन.सी.सी ग्रुप हेड अंतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी हे चार जिल्हे आहेत. या चार जिल्ह्यामधून सार्जंट हर्षवर्धन निवड होणार एकमेव कॅडेट आहे. शांतिनिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिरचा एन.सी.सी. विभाग सुरुवातीपासूनच कार्यक्षम राहिलेला आहे.

अभिनंदन व शुभेच्छा : या निवडीबद्दल संस्थेचे संचालक गौतम पाटील, उपसंचालक बी.आर. थोरात, डी.एस.माने, अकॅडमीच्या इन्चार्ज डॉ. समिता पाटील, कार्यकारणी सदस्य शिवाजीद पाटील, शालेय समिती अध्यक्ष हनसी, सुनील मोहिते आदींनी. हर्षवर्धनचे कौतुक करत व त्यास शुभेच्छा दिल्या. तसेच बेलवडे बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनेही हर्षवर्धनचे अभिनंदन करून त्याला शुभेच्छा देण्यात आल्या.

बहुमूल्य मार्गदर्शन : मुख्याधापक कॅप्टन एस.बी. खांडेकर, सांस्कृतीक विभागाचे प्रमुख व एन.सी.सी. थर्ड ऑफिसर जे. वाय. कदम, उपमुख्याधापक एम. आर. कोळेकर, सुपरवायझर एस.एस. खंडागळे, १६ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. व कर्नल अभिजीत बर्वे यांचे मार्गदर्शन लाभले. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!