कराड/प्रतिनिधी : –
सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या जन्मशताब्दीनिमित्त यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर १६ ते १८ जानेवारी दरम्यान खुल्या गटातील भव्य राज्यस्तरीय पुरूष कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
विजेत्यांना आकर्षक बक्षिसे : कराड तालुका साखर कामगार युनियन व गणेश शिवोत्सव मंडळ व कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेतील विजेत्या प्रथम, द्वित्तीय, तृत्तीय, चतृर्थ क्रमांकाच्या संघाला अनुक्रमे ५० हजार १११ रुपये व चषक, ४० हजार १११ रुपये व चषक, ३० हजार १११ रुपये आणि २० हजार १११ रुपये बक्षिसे देण्यात येणार आहेत. याचबरोबर अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकड यासाठी प्रत्येकी २ हजार १११ रुपये व चषक पारितोषिक देण्यात येणार आहे.
आवाहन : या स्पर्धा सहकारमहर्षी जयवंतराव भोसले क्रिडानगरी येथे खेळविल्या जाणार असून, संघांनी प्रा. संजय पाटील (९८५०२३९५००), प्रा. अमोल मंडले (८६०५९८४५६७ ), प्रा. महेश कुंभार (९८५०९१९८५०), ज्ञानदेव पाटील (९८२३९४६३४६), राहुल निकम (९९७५७९८५७९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजक कराड तालुका साखर कामगार युनियनचे अध्यक्ष एम. के. कापूरकर यांनी केले आहे.