कराड/प्रतिनिधी : –
भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. सकाळी सूर्योदयाबरोबर त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. विद्या वेताळ यांनी त्यांचे औक्षण केले. आई- वडिलांचे आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांनी कुलदैवत श्री जोतिबा देवाचा अभिषेक केला. वाढदिवसानिमित्त रामकृष्ण वेताळ यांना शुभेच्छा देण्यासाठी सुर्ली येथे मान्यवरांसह हितचिंतक व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
आदरांजली : वाढदिवसानिमित्त सुर्ली येथे गायींना चारा वाटप, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला आदरांजली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयास सदिच्छा भेट, पाल येथील श्री. खंडोबाचे दर्शन घेतले. त्यानंतर सुर्ली येथे रामकृष्ण वेताळ यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला.
शुभेच्छांचा वर्षाव : यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आमदार मनोजदादा घोरपडे, भाजपा कोरेगाव तालुकाध्यक्ष भिमराव पाटील, कराड उत्तर संयोजक महेशकुमार जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, प्रमोद गायकवाड, राजाराम गरुड, कराड तालुकाध्यक्ष शंकरराव शेजवळ, सागर शिवदास, चंद्रकांत मदने, सुरेश कुंभार, कुलदीप क्षिरसागर, सूर्यकांत पडवळ, विश्वासराव काळभोर, प्रशांत भोसले, विकास गायकवाड, सागर हाके, रणजीत माने, नवीन जगदाळे, अधिक पाटील, शहाजी मोहिते, कविता कचरे, दिपाली खोत, रुक्मिणी जाधव, सीमा घार्गे, स्वाती पिसाळ, पूजा साळुंखे, वैशाली मांढरे यांच्यासह बाजार समितीचे संचालक, भाजप पदाधिकारी, नगरसेवक व खटाव, कोरेगाव, सातारा, कराड, पाटण, कडेगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा : भ्रमणध्वनीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सार्वजनिक बाधकाम श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, भाजप किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, विधानपरिषद आमदार विक्रांत पाटील, खा. रणजीतसिंह नाईक – निंबाळकर, माजी खासदार श्रीनिवास पाटील, खा. अनिल बोंडे, महिला जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, श्रीनिवास जाधव, सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर आदींनी श्री वेताळ यांना शुभेच्छा दिल्या.
कौतुकाची थाप
आमदार मनोज घोरपडे त्यांनी रामकृष्ण वेताळ यांचा जनसंपर्क, पक्ष वाढीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि लोकांच्या मनात त्यांची निर्माण झालेली प्रतिमा हीच या जनसागरामध्ये दिसून येत असल्याचे बोलून दाखवत रामकृष्ण वेताळ यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. तसेच जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनीही श्री वेताळ यांचे कौतुक केले.