डॉ. सुरेश भोसले; कृष्णा बँकेच्या पलूस शाखा उद्घाटन
कराड प्रतिनिधी : –
शेतकऱ्यांच्या मुलांना, तसेच इतरही ग्राहकांना उद्योग-व्यवसायाच्या उभारणीसाठी प्रोत्साहनपर आवश्यक आर्थिक सहकार्य करण्यासाठी कृष्णा बँक प्रयत्नशील आहे. या भागातील ग्राहकांनी बँकेच्या विविध कर्ज व ठेव योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेऊन आर्थिक उन्नती साधावी, असे मत यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केले.
22 वी शाखा सुरू :कृष्णा सहकारी बँकेची 22 वी शाखा पलूस (जि. सांगली) येथे सुरु करण्यात आली आहे. या नव्या शाखेचे उद्घाटन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते आणि बँकेचे चेअरमन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी बँकेच्या यु.पी.आय. सेवेचाही प्रारंभ करण्यात आला.
बँकेने नवलौकिक वाढवला :आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, कृष्णा सहकारी बँकेने नेहमीच ग्राहकाभिमुख कारभाराला प्राधान्य दिले आहे. बँकेने अनेक पुरस्कार प्राप्त करुन आपला नावलौकिक वाढविला असून, बँकेला ‘ए प्लस’ मानांकन मिळाले आहे. ग्राहकांच्या आर्थिक उन्नतीसाठी कृष्णा सहकारी बँक सदैव कटीबद्ध असून, पलूसकरांच्या सेवेसाठी बँकेची नवी शाखा कार्यरत राहील.
मान्यवर : याप्रसंगी उद्योजकांना क्यूआर कोड स्टॅन्डचे वितरण करण्यात आले. यावेळी कृष्णा कारखान्याचे संचालक बाबासो शिंदे, कृष्णा बँकेचे उपाध्यक्ष दामाजी मोरे, संचालक विजय जगताप, गिरीश शहा, प्रदीप पाटील, महादेव पवार, शिवाजीराव थोरात, हेमंत पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव, निलेश येसुगडे, सर्जेराव नलवडे, संजय येसुगडे, शंकरराव पाटील, गजानन पाटील, नितीन लाड, निरंजन कदम, तन्मय पाटील, विजय पाटील, गौरव पाटील, राजीव खोत, रामानंद पाटील, श्रीराम माने, चंद्रकांत आळते यांच्यासह संचालक मंडळ व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.