केसे (ता. कराड) येथील भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या चेअरमनपदी पंजाबराव विठ्ठलराव पाटील व व्हा. चेअरमनपदी चंद्रकांत दाजी पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
निवड : संस्थेच्या कसे येथील कार्यालयात अध्यासी अधिकारी सौ. ए. एस. थोरात यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी संपन्न झाल्या. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ मावळते चेअरमन आनंदराव जागरू जमाले म्हणाले, आम्ही सत्तेत आल्यापासून संख्येच्या सभासदांना वेळेवर पाणी देण्याचे काम केले. येथून पुढे सुध्दा संख्येच्या सभासदांना वेळेवर पाणीपुरवठा होईल, याबाबत चांगले नियोजन करू.
शुभेच्छा : मावळते चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक व उपस्थित शेतकऱ्यांनी नवनियुक्त विद्यमान चेअरमन पंजाबराव पाटील व चंद्रकांत पाटील यांना संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
चांगले काम करू :याप्रसंगी चेअरमन पंजाबराव पाटील यांनी संस्थेच्या पुढील कामकाजाविषयी त्यांची भूमिका स्पष्ट केली. तसेच शेतकरी सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून चांगल्याप्रकारे कामकाज करू, अशी ग्वाही दिली.
उपस्थिती : याप्रसंगी आनंदराव जमाले, महेश शिंदे, सिद्धेश्वर पाटील, विनायक शिंदे, शब्बीर मुजावर, प्रकाश पाटील, तानाजी देशमुख, रणजीत पाटील, दिनकर येडगे, शिवाजी लोंढे व संचालिका सौ. आशाताई धुमाळ, संख्येचे सेक्रेटरी संभाजी पाटील आदी मान्यवरांसह मुंढे, वारुंजी, गोटे, केसे, सुपने, पाडळी या गावातील सभासद मोठ्या संख्येने व संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.