एकनाथ बागडींचे सामाजिक कार्य अभिमानास्पद 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

मंत्री जयकुमार गोरे; भाजपच्या कराड  शहर कार्यालयास सदिच्छा भेट 

कराड/प्रतिनिधी : – 

समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून काम करण्याची संधी मंत्रीपदामुळे मिळाली आहे. त्यासाठी भाजपसह मी सदैव तत्पर राहिन. शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांचे सामाजिक कार्य अभिमानास्पद आहे. त्यांनाही सर्व कार्यात सहकार्य राहिल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

सदिच्छा भेट : मंत्री श्री. गोरे कराडच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी भाजपच्या येथील शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी स्वागत केले.

उपस्थित मान्यवर : यावेळी आमदार डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, प्रदेश सदस्य भरत पाटील, प्रदेश सदस्य रामकृष्ण वेताळ, भिमराव पाटील माजी जिल्हापरिषद सदस्य अरुण गोरे, सागर शिवदास, तालुकाध्यक्ष धनाजी पाटील निलेश माने, शिवाजी शिंदे सुनील शिंदे, शंकरराव शेजवळ, दीपक महाडिक, नाना सावंत, भैय्यासाहेब पाटणकर, रामभाऊ डुबल, महादेव साळुंखे, गणेश सत्रे, गणेश यादव, चिन्मय कुलकर्णी, प्रमोद शिंदे, प्रशांत कुलकर्णी, रुपेश मुळे, विश्वनाथ फुटाणे, सोपान तावरे, संजय शाह, प्रितेश मेहता, विवेक भोसले, सौरभ शाह, राजेंद्र खोत, राहुल आवटे, अनिल पवार, विशाल कुलकर्णी, किसन चौगुले, सागर लादे, चेतन थोरवडे, सुदेश थोरवडे, नितीन भोसले, अनिकेत वास्के, सुमन बागडी, भारती शिंदे, पल्लवी तावरे, सावित्री पवार, स्वाती पवार, मंजिरी कुलकर्णी, कविता माने, सारिका गावडे, राजश्री कारंडे, राधिका पन्हाळे, सरिता हरदास, वहिदा सुतार आदी उपस्थित होते.

एकनाथ बागडींना उज्वल भवितव्य : शहरात भाजपचा विचार रुजवण्यासाठी एकनाथ बागडी सातत्याने कार्यरत असतात, असे सांगताना मंत्री गोरे म्हणाले, अनेक वर्षे त्यांनी पक्षाचे काम प्रामाणिकपणे व सचोटीने केले आहे. त्यामुळे शहरात भाजपची ताकद वाढली आहे. त्यांना नक्कीच उज्वल भवितव्य आहे. त्यांच्या पाठीशी भाजप कायम ताकदीने उभा राहील. माझे स्वतःचे सर्वतोपरी सहकार्य त्यांना नक्कीच राहील, असे त्यांनी सांगितले.

विकास करण्यासाठी कटिबद्ध : सातारा जिल्ह्यातील अनेक गावांना हायटेक सुविधा देण्याची संधी भाजपमुळे मिळाली मिळाल्याचे सांगताना मंत्री गोरे म्हणाले, त्या सगळ्यांचा विचार करून विकासासाठी प्रयत्न करणार आहे. लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्याचाही विचार करून योग्य त्या पध्दतीने विकास करण्यासाठी कटिबध्द राहू. 

मनोगत : यावेळी आमदार डॉ. अतुल बाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे व जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी मनोगत व्यक्त केले. शहराध्यक्ष बागडी यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रमोद शिंदे यांनी आभार मानले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!