महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज कराड दौऱ्याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसला भेट दिली. याठिकाणी त्यांनी सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले.
अभिवादन : नुकत्याच झालेल्या खातेवाटपात सातारा – जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदी वर्णी लागली. या निवडीनंतर आज प्रथमच ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले कराड दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसला भेट दिली. यावेळी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर ना. भोसले यांनी सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले.