बाबासाहेबांचे संविधान आचरणात आणूया 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

पृथ्वीराज चव्हाण; कराडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन 

कराड/प्रतिनिधी : – 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला दिलेले संविधान आचरणात आणण्याची आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

अभिवादन : डॉ. बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी  कराड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट देऊन अभिवादन केले. यावेळी कराड शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

बाबासाहेबांचे विचार विसरणार नाही :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आणि त्यांनी देशाला दिलेले संविधान हे या देशातील जनता कधीही विसरणार नाही. असे सांगत श्री. चव्हाण म्हणाले, संविधान वाचवण्याची लढाई ही कायमस्वरूपी आपल्याला लढावी लागेल. बाबासाहेबांनी आपल्याला घालून दिलेला आदर्श डोळ्यासमोर ठेवून शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत राहणं हाच त्यांनी दिलेला संदेश आपण आत्मसात करायला हवा.

न्याय, समता, बंधुत्वाचे राज्य : महाराष्ट्रातील सर्व जनता पुन्हा नवीन प्रेरणा घेऊन संविधानाबाबतची लढाई अधिक ताकतीने लढेल. असा विश्वास व्यक्त करत श्री. चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात जे काही चालले आहे, त्याबाबत मी आपली प्रखर भूमिका घेईन आणि न्यायाचं, समतेच, बंधुत्वाचं राज्य आणि संविधान कधीही नष्ट होणार नाही; याची काळजी घेईन, अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!