समाजभूषण बाबुराव गोखले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजन
कराड/प्रतिनिधी : –
समाजभूषण कै. पुरुषोत्तम पांडुरंग तथा बाबुराव गोखले स्मारक समिती कराडच्या वतीने समाजभूषण बाबुराव गोखले यांच्या 38 व्या स्मृतिदिनानिमित्त गीतेचे गाडे अभ्यासक विवेक सबनीस यांचे “दैनंदिन जीवनात गीतेचे महत्व” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती स्मारक समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
वेळ व ठिकाण : येथील नवीन कृष्णाबाई मंगल कार्यालयात गुरुवार, दि. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता या व्याख्यानेचे आयोजन करण्यात आले आहे.
आवाहन : या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कै. बाबुराव गोखले स्मारक समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष सुभाषराव जोशी, कार्याध्यक्ष विठ्ठलराव शिखरे, कार्यवाह वि. के. जोशी व माधव माने यांनी केले आहे.