निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडून कौतुकाची थाप
कराड/प्रतिनिधी : –
260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 342 मतदान केंद्रांपैकी सर्व कामकाज आटोपून सर्व मतदान साहित्य जमा करण्यासाठी शासकीय धान्य गोदाम, कराड येथे दाखल झालेल्या पहिल्या सहा मतदान केंद्रांचा सन्मान निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी पुष्पगुच्छ देऊन केला.
कौतुकाची थाप : या सर्व टीमनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक केले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपल्या कामाचे कौतुक करून कौतुकाची थाप टाकल्याने सर्व मतदान केंद्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान स्पष्ट दिसून आले.
अधिकाऱ्यांची उपस्थिती : यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप कोळी, आचारसंहिता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी एस. एस. पवार, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, नायब तहसीलदार विश्वजीतसिंह राजपूत, प्र. नायब तहसीलदार युवराज पाटील, प्रांत कार्यालयाचे अव्वल कारकून गोपाल वसू, प्रांत कार्यालयाचे कर्मचारी प्रविण साळुंखे, प्रविण तुपे, प्रकाश नागरगोजे, आयटी सेलचे प्रवीण पवार, नोडल अधिकारी प्रमोद मोटे, नोडल अधिकारी के. प्रसाद, झोनल कॉर्डिनेटर विकास पाटील, शिवराज माळी, तांत्रिक अभियंता स्वप्निल नलवडे, राजेंद्र कांबळे, दिपक पाटील, प्रल्हाद देटके, अमोल चव्हाण, तेजस थोरात, अनुष कांबळे उपस्थित होते.