डॉ. अतुलबाबा भोसले; कुटुंबीयांसमवेत बजावला मतदानाचा हक्क
कराड/प्रतिनिधी : –
भविष्यातील 50 वर्षांत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी व लोकांच्या प्रगतीसाठी काम करण्याचे व्हिजन आपण मतदारांसमोर मांडले आहे. तसेच स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. यशवंतराव मोहिते आणि स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) यांचा वैचारिक वारसा घेऊन आम्ही लोकांसमोर गेलो. त्यामुळे यावेळी मतदारराजा मला सेवेची संधी देईल, याची खात्री असल्याचे मत उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केले.
मतदानाचा बजावला हक्क : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधील महायुतीतर्फे भाजपचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी, त्यांची पत्नी सौ. गौरवी भोसले यांच्यासमवेत रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथे पवार मळा येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. तसेच कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, सौ. उत्तरा भोसले आणि श्री. विनायक भोसले यांनीही या केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
माध्यमांशी संवाद : या निवडणुकीत जनतेला मला मनापासून साथ दिल्याचे सांगताना डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही सकारात्मक प्रचारावर भर देत, विकासकामांचे मुद्दे जनतेसमोर मांडले. तसेच स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. यशवंतराव मोहिते आणि स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) यांचा वैचारिक वारसा घेऊन आम्ही लोकांसमोर गेलो. त्यामुळे यावेळी मतदारराजा मला आपल्या सेवेची संधी देईल, याची आपल्याला खात्री असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.