दत्त जयंतीनिमित्त शिर्डी ते कराड साई पालखी सोहळा
कराड/प्रतिनिधी : –
येथील श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्यावतीने श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त श्री क्षेत्र शिर्डी ते कराड श्री साई पालखी सोहळा शुक्रवार, दि. 29 नोव्हेंबर ते शनिवार, दि. 14 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार (दि. 29) सकाळी 8.30 वाजता श्री दत्त मंदिर – लेंडीबाग, शिर्डी येथून श्री साईबाबा पालखीचे कराडकडे दिमाखात प्रस्थान होईल. कोल्हापूरचे ज्ञानेश्वर हरी काटकर यांच्या प्रेरणेने व कोल्हापुरचे गोविंद वसुदेव रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पालखी पूजन व प्रस्थान : पालखी सोहळाल्या शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अहमदनगरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे – सोनटक्के, श्री साई पालखी सोहळा समितीचे संस्थापक, अध्यक्ष उदयसिंह देसाई यांच्या उपस्थितीत पालखी पूजन व प्रस्थान कार्यक्रम होणार आहे. पालखी सोहळ्यात चहा व नाष्टा, सकाळी 9 वाजता, तर दुपारी 12 ते 3, तसेच सायंकाळी 4 वाजता अल्पोपहार व रात्री 8 वाजता महाप्रसाद व विसावा होणार आहे.













