य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर थोर विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ) यांना जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी कारखान्याचे संचालक जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, कार्यकारी संचालक महावीर घोडके, मनोज पाटील, एम. के. कापूरकर, बाळासाहेब पाटील, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, प्राचार्य डॉ. अशोक फरांदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाऊंच्या स्मृतींना उजाळा : माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, एम. के. कापूरकर यांनी स्व. यशवंतराव मोहिते भाऊंच्या स्मृतींना उजाळा दिला. संचालक धोंडीराम जाधव यांनी आभार मानले. यावेळी जनरल मॅनेजर (टेक्निकल) बालाजी पबसेटवार आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.