यशवंतराव मोहिते भाऊंनी पुरोगामी विचार जपला 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आ. पृथ्वीराज चव्हाण; रेठरे बुद्रुक येथे जयंतीनिमित्त अभिवादन

कराड/प्रतिनिधी : – 

राज्याचे ज्येष्ठ विचारवंत व माजी मंत्री स्व. यशवंतराव मोहिते यांनी आयुष्यभर पुरोगामी जपला. भाऊंच्या पिढीचा आदर्श सध्याच्या राजकीय गोंधळातील परिस्थितीत महत्वाचा ठरतो, असे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

104 व्या जयंतीनिमित्त अभिवादन : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते यांच्या निवासस्थानी त्यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण आ. चव्हाण यांनी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी यशवंतराव मोहिते यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी ते बोलत होते. 

मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. इंद्रजित मोहिते, डॉ. विश्र्वेंद्र मोहिते, अॅड. नरेंद्र नांगरे – पाटील, युवा नेते इंद्रजित चव्हाण, राष्ट्रीय काँग्रेसचे  सेवादलाचे कराड दक्षिणचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, देवदास माने, अधिकराव गरुड, सुभाषराव पाटील, लालासाहेब थोरात, बबन सुतार, सनी मोहिते, अभिजित सोमदे, विकास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!