डॉ. अतुल भोसले; पदयात्रेला कराडकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कराड/प्रतिनिधी : –
महायुती शासनाच्या माध्यमातून
कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, वाखाण रोड आदी कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. शहराच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे. येत्या काळात सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधा मार्गी लावून, सर्व समस्या सोडविण्यावर माझा भर देणार असल्याची ग्वाही डॉ. अतुल भोसले यांनी दिली.
पदयात्रेस कराडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : भाजप – महायुतीचे कराड दक्षिण मतदारसंघातील उमेदवार डॉ. बाबा भोसले यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या पदयात्रेला उत्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मोठ्या मताधिक्याने विजयी करा : कराड शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे सांगत डॉ. भोसले म्हणाले, यापुढे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण निधी कमी पडू देणार नाही. यासाठी कराडकर नागरिकांनी मला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
नागरिकांशी हस्तांदोलन व संवाद : कराड शहरातून श्री गणपती मंदिर तेली गल्ली, आझाद चौक, भोई गल्ली, डवरी गल्ली, सात शहीद चौक, रंगारवेस मारुती मंदिर या मार्गावर पदयात्रा काढण्यात आली. या यात्रेदरम्यान डॉ. भोसले अतुलबाबांनी नागरिकांशी हस्तांदोलन करत संवाद साधला. या पदयात्रेस कराडकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मान्यवरांचा सहभाग : या पदयात्रेत कराडचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष डुबल, भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, रणजीतनाना पाटील, अजय पावसकर, मुकुंद चरेगावकर, किरण मुळे, समाधान चव्हाण, संग्राम चव्हाण, विक्रम भोपते, नितीन शहा, अभिषेक भोसले, प्रमोद शिंदे यांच्यासह कार्यकर्ते, माहितीतील विविध पक्षांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.