शेतकरी, तरुण पाठीशी उभे राहतील 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

इंद्रजीत गुजर; विंग येथून प्रचाराचा शुभारंभ 

कराड/प्रतिनिधी : – 

शेतकरी, कष्टकरी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या माध्यमातून ही लढाई उभी केली आहे. या लढाईत शेतकरी, तरुण आणि सर्वसामान्य नागरिक आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, अशी आशा इंद्रजीत गुजर यांनी व्यक्त केली.

प्रचाराचा शुभारंभ : विंग (ता. कराड) येथून सोमवारी परिवर्तन महाशक्ती आघाडीचे अधिकृत उमेदवार इंग्रजीत गुजर (कॅप्टन) यांच्या प्रचाराचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी परिवर्तन महाशक्ती आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

दोन बलाढ्य शक्तींविरोधात लढाई : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात दोन बलाढ्य शक्तींविरोधात आमची लढाई असल्याचे सांगत श्री. गुजर म्हणाले, जनता व शेतकऱ्यांची ताकद मोठी असून ही जनताच आता कराड दक्षिणमध्ये इतिहास घडवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

जनताच धक्कादायक निकाल लावेल : शेतकरी नेते माजी खा. राजू शेट्टी, प्रहार जनशक्तीचे नेते आ. बच्चू कडू आणि स्वराज्य संघटनेचे नेते माजी खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या माध्यमातून राज्यात विधानसभा निवडणुका लढवण्यात येत आहेत. त्यानुसार कराड दक्षिणमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी ही निवडणूक लढवण्यात येत असून येथील जनताच धक्कादायक निकाल लावेल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!