राजेंद्रसिंह यादव; यशवंत विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा उत्साहात
कराड/प्रतिनिधी : –
तरुण, तडफदार नेते डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी महायुती शासनाच्या माध्यमातून सुमारे 750 कोटींचा विकासनिधी आणला आहे. तसेच माझ्या माध्यमातून शहरातील भुयारी गटर, पाणी योजनेसह अन्य कामांसाठी 209 कोटी रुपये आले आहेत. यातून होणाऱ्या कामांमुळे कराड दक्षिणच्या विकासाची गंगा अशीच सुरू ठेवण्यासाठी महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांना आम्ही कराड शहरातून मोठे मताधिक्य देणार असल्याची ग्वाही यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी दिली.
कार्यकर्ता संवाद बैठक : भाजप – महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रमुख कार्यकर्ता संवाद बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर डॉ. अतुलबाबा भोसले, माजी नगराध्यक्षा संगीता देसाई, माजी सभापती स्मिता हुलवान, माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, हणमंत पवार, शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र माने, सुधीर एकांडे यांच्यासह आघाडीचे माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

… त्याचे परिणाम भावी पिढीला भोगावे लागतील :
देशाचे आणि राज्याचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक असल्याचे सांगत श्री. यादव म्हणाले, जनतेने चुकीचा निर्णय घेतला, तर त्याचे परिणाम भावी पिढीला भोगावे लागतील. यामुळे राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर असलेल्या महायुतीला पुन्हा संधी देण्याची गरज असून यात जनतेने दक्षिणमधून डॉ. अतुलबाबा भोसले यांना विजयी करावे.
राजेंद्रसिंह यादव यांचे मोठे नेतृत्व : कराड शहरात काम करणारे राजेंद्रसिंह यादव यांचे नेतृत्व मोठे असल्याचे सांगत डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, राजेंद्रसिंह यादत विविध विकासकामे करत असताना. यापुढे आपण त्यात महत्वाचा वाटा उचलण्याचा प्रयत्न भविष्यात करणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
मान्यवरांची भाषणे : यावेळी हणमंतराव पवार, राजेंद्र माने, स्मिता हुलवान यांची भाषणे झाली. सचिन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
