कराड रोटरी, जिल्हा योग समिती आणि ज्ञानदीपचा उपक्रम
कराड/प्रतिनिधी : –
रोटरी क्लब ऑफ कराड, सातारा जिल्हा योग समिती आणि ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था यांचे संयुक्त विद्यमाने सातारा जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा दि कराड अर्बन बँकेच्या मुख्य शाखा सभागृहात संपन्न झाली.
महिला व पुरुषांच्या 16 वयोगटात स्पर्धा :
या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे उदघाटन दीप प्रज्वलन व ओंकार प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. प्रोजेक्ट चेअरमन रो. गजानन कुसुरकर व डिस्ट्रिक्ट इम्पॅसिस डायरेक्टर रो. अनिल कलबुर्गी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ही स्पर्धा महिला व पुरुष अशा दोन गटात एकुण 16 वयोगटात झाली. स्पर्धेसाठी जिल्ह्यातून 95 स्पर्धक आले होते. स्पर्धा खेळीमेळीच्या व उत्साहवर्धक वातावरणात पार पडली. या स्पर्धेतील विजेत्यांना मेडल, प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात आले.
परीक्षण व योगदान :स्पर्धेचे परीक्षक म्हणून मानसिंग गोडसे, सौ. मंजुषा गायकवाड, सौ. अपूर्वा लाटकर, रो. गजानन कुसुरकर यांनी काम पहिले. रो. प्रशांत लाड यांनी प्रमाणपत्र नोंदवण्याचे काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी रो. किरण जाधव, रो. अनिल कलबुर्गी, रो. अभय नांगरे, रो. प्रबोध पुरोहित, रो. राजगोंडा अप्पीने, रो. विनायक राऊत, रो. शिवराज माने, सौ. जयश्री कुसुरकर यांनी प्रयत्न केले.
योगासनाचे महत्त्व विषयावर मार्गदर्शन :दरम्यान, रो. शिवराज माने यांनी स्पर्धकांना मनाचे व्यवस्थापन, योगासनाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. या स्पर्धेतील विजेत्यांची निवड नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय योग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. रो. गजानन कुसुरकर यांनी प्रास्तविक केले. रोटरी क्लब कराडचे अध्यक्ष रो. रामचंद्र लाखोले यांनी स्वागत केले. सौ. पद्मिनी पवार यांनी सूत्रसंचालन केले. रोटरी क्लब कराडचे सचिव रो. आनंदा थोरात यांनी आभार मानले.