9 टक्क्यांची विशेष व्याजदर योजना; लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वाहन वितरण
कराड/प्रतिनिधी : –
येथील कराड मर्चंट संस्थेने दिवाळी सणानिमित्त नवीन वाहन खरेदीसाठी वाहन तारण योजना लागू केली आहे. या योजनेमध्ये दुचाकी, चारचाकी वाहनांना विशेष अशा 9 टक्के व्याजदराने कर्ज वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सत्यनारायण मिणीयार यांनी दिली.
लाभार्थ्यांना वाहन वितरण : या योजनेच्या शुभारंभप्रसंगी संस्थेचे संस्थापक सत्यनारायण मिणीयार यांच्या हस्ते या योजनेंतर्गत दोन नवीन वाहनांचे वितरण करण्यात आले. यामध्ये युवा उद्योजक महेश पाटील यांना टोयाटो लिजेंडर व अजय पावसकर यांना स्कॉरपीओची चावी प्रदान करण्यात आली.
संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घ्या : याप्रसंगी बोलताना वाहन तारण योजनेचा लाभ युवा उद्योजक, व्यावसायिक अशा सर्व स्तरातील लोकांनी घ्यावा, असे आवाहन श्री. मिणीयार यांनी केले. तसेच महिला लघु उद्योजकांसाठी 9.90 टक्के व्याजदराची कर्ज योजनाही लागू करण्यात आली आहे. या संधीचा महिलांनी लाभ घ्यावा. संस्थेने ठेवीवर 9.10 विशेष व्याजदर व जेष्ठ नागरिकांसाठी 10.10 टक्के व्याजदर लागू केला असून त्याचाही सर्व ग्राहकांनी फायदा घ्यावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक माटेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाजीराव यादव, शाखा प्रमुख अरुण पवार व सर्व अधिकारी, सेवक उपस्थित होते.