कृष्णा हॉस्पिटलमध्ये मिळणार मोफत उपचार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

बांधकाम कामगारांसाठी दोन लाखांपर्यंत उपचार मोफत; कुटुंबियांनाही मिळणार लाभ

कराड/प्रतिनिधी : – 

येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना 2 लाखांपर्यंतचे उपचार मोफत देण्यात येणार आहेत. या कामगारांच्या वैद्यकीय नोंदणीसाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कक्षाची सुरुवात आज सोमवार, दि. 14 पासून करण्यात आली आहे.

बांधकाम कल्याणकारी मंडळाची योजना : महाराष्ट्र शासन आणि इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्यावतीने नोंदीत बांधकाम कामगारांसाठी विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. या योजनांचा लाभ सर्व बांधकाम कामगारांना मिळवून देण्यासाठी डॉ. अतुल भोसले विशेष प्रयत्नशील आहे. नोंदीत बांधकाम कामगारांना 2 लाखापर्यंतच्या उपचार सुविधांबरोबर अन्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. या सुविधा आता कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाल्याने बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची मोठी सोय झाली आहे.

मान्यवरांच्या हस्ते कक्षाचे उद्‌घाटन : कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय कणसे आणि कृष्णा विश्व विद्यापीठाचे उपकुलसचिव एस. ए. माशाळकर यांच्या हस्ते या कक्षाचे उद्‌घाटन करण्यात आले. या कक्षामध्ये नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची वैद्यकीय नोंदणी केली जाणार आहे. तसेच 24 प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत.

तळागाळातील घटकांसाठी सातत्याने नाविण्यपूर्ण उपक्रम : कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटल समाजातील तळागाळातील घटकांसाठी सातत्याने नाविण्यपूर्ण उपक्रम राबवित असल्याचे सांगत  श्री. माशाळकर म्हणाले, बांधकाम कामगार हा आत्तापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या; पण समाजाच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान देणाऱ्या घटकासाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. त्यांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी कृष्णा हॉस्पिटल सदैव तत्पर असून, या कक्षाला भेट देऊन, बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांनी विविध वैद्यकीय सुविधांचा लाभ घ्यावा.

मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी कृष्णा हास्पिटलच्या विमा अधिकारी प्रियांका पवार, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे समन्वयक विक्रम पाटील, विक्रम पवार, माणिक साळुंखे, धनाजी माने यांच्यासह हॉस्पिटलचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

वैद्यकीय योजनेचा लाभ कसा मिळवाल?

नोंदीत बांधकाम कामगार, त्याची पत्नी अथवा पती, त्यांची 10 वर्षांवरील पहिली 2 अपत्ये, तसेच नोंदीत कामगाराचे आई – वडील किंवा सासू – सासरे यांना या वैद्यकीय योजनेचा लाभ घेता येणार आहे. वैद्यकीय नोंदणीसाठी येताना लाभार्थीने नोंदणी कार्ड व आधार कार्ड, तसेच संबंधित नातेवाईकांचे आधारकार्ड घेऊन यावे, असे आवाहन कृष्णा हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!