तांबवेतील जातीय सलोखा राज्याला आदर्शवत – महेंद्र जगताप

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

मुस्लीम समाजातर्फे गणेशाची आरती; हिंदु-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडवण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे

कराड/प्रतिनिधी : –

समाजातील सलोखा कायम रहावा, एकमेकांबद्दल आपुलकी निर्माण होवून गावा-गावातील सलोख्याचे वातावरण आणि एकोपा कायम रहावा या हेतुने तांबवे, ता. कराड येथील संगम गणेश मंडळाने राबवलेला उपक्रम सातारा जिल्ह्यासमोरच नव्हे; तर राज्यासमोर आदर्शवत आहे. हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादीय असून यातून जातीय सलोखा कायम राहण्यास मदत होईल, असे प्रतिपादन कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी केले.

तांबवे येथील संगम गणेश मंडळाच्यावतीने मुस्लीम समाजाच्यावतीने श्री गणेशाची आरती करण्यात आली. त्यानंतर ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी विजय विभुते, पोलीस उपनिरीक्षक भिलारी, सरपंच शोभाताई शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, उपसरपंच अॅड. विजयसिंह पाटील, ग्रामपंचायत सदस्य धनंजय ताटे, माजी जिल्हा परिषद सदस्या विजयाताई पाटील, आण्णासाहेब पाटील, इंदुताई पाटील, डॉ. एम. एन. संदे, वजीर संदे, माजी सरपंच जावेद मुल्ला, राजुबा संदे, आश्रफ मुल्ला, समीर मुल्ला, सुरज तांबोळी, रसुल मुल्ला, माजी मुख्याध्यापक पी. एम. पवार, बी. बी. शिंदे, शंकर पाटील, निवृत्त पोलीस निरीक्षक छगन जाधव, तात्यासाहेब पाटील, गुणवंत पाटील, दत्तात्रय भोसले, मुख्याध्यापक आबासाहेब साठे देवानंद राऊत, विलासराव देसाई  उपस्थित होते.

सोशल मिडियाला बळी पडू नका : तांबवेत मुस्लीम समाजाच्यावतीने श्री गणेशाच्या आरतीचे नियोजन केले जाते, ही खुप मोठी गोष्ट आहे. आपल्या ज्येष्ठ लोकांनी आपली पंरपरा जपण्याचे काम अनेक वर्षांपासून केले आहे. सध्या सोशल मिडियाचा जमाना आहे. त्याला बळी न पडता यापुढे हिंदु-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडवण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले आहे. गावामध्ये शांतता कशी राहिल, याकडे सर्वांनी कटाक्षाने लक्ष ठेवले पाहिजे, असे मत पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी व्यक्त केले.

मंडळाच्या उपक्रमाबद्दल कौतुक : सहाय्यक गटविकास अधिकारी विभुते यांनी अशा मंडळाची समाजात आज गरज असल्याचे सांगितले. डॉ. संदे, अतुल पाटील, शंभूराज पाटील यांनी मंडळाच्या उपक्रमाबद्दल कौतुक केले. मंडळाचे अध्यक्ष मंगेश पाटील, सचिव गणेश देसाई, शरद पवार, सुरेश फिरंगे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक अॅड. पाटील यांनी केले. सुत्रसंचालन सतीश यादव यांनी, तर मंगेश पवार यांनी आभार मानले. यावेळी ग्रामस्थ, मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या रत्नांचा झाला सन्मान : तांबवे गावासह परिसरातील तरुणांनी आपल्या कर्तुत्वाने त्यांचे आणि गावाचे नाव राज्यातच नाही, तर देशपातळीवर पोहचवले आहे. असे राष्ट्रीय खेळाडू प्राची देवकर, अर्थव ताटे, निकीता पवार, राष्ट्रीय प्रशिक्षक अतुल पाटील, पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेले नंदकुमार पाटील, मंत्रालयात निवड झालेले सुमित पाटील, तामीळनाडू विद्यापिठाची डीलीट पदवी मिळालेले शंभूराज पाटील, सैन्यदलात भरती झालेले आकाश फल्ले, शुभम पाटील, फार्मासिस्टपदी निवड झालेल्या स्मिता पाटील आणि मुंबई पोस्ट खात्यात निवड झालेले स्वप्नील पाटील यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!