निर्मलग्राम शेवाळेवाडीत अंतर्गत रस्ते विकासकामाचा शुभारंभ
कराड/प्रतिनिधी :
महिलांना प्रत्येक गोष्टीत 50 टक्के सामावून घेऊन मानसन्मान घ्या. तसेच त्यांना सामाजिक कार्यात पुढाकार देऊन महिला सक्षमीकरणाच्या कार्यात सहभागी करून घ्या, असे आवाहन भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी केले.
निर्मल ग्राम शेवाळेवाडी (उंडाळे), ता. कराड येथे दहा लाख रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या अंतर्गत रस्ते विकासकामांचा शुभारंभ डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
प्रमुख उपस्थिती : कार्यक्रमास उद्योजक रमेश शेवाळे, व्ही. के. शेवाळे डी. जे. शेवाळे, जी. पी. शेवाळे, उत्तम शेवाळे, किसन शेवाळे, संभाजी शेवाळे यांसह मान्यवरांची उपस्थितीत होती.
महिलांना भूमिपूजनाचा मान अभिमानास्पद : महिलांना सामाजिक कार्यामध्ये पुढाकार द्या, प्रत्येक कार्यक्रमात सहभागी करून घ्या. महिलांना 50 टक्के प्रत्येक गोष्टीत सहभागी करून घेऊन महिलांना सर्व गोष्टीत मानसन्मान देणे गरजेचे असल्याचे सांगत डॉ. भोसले म्हणाले, आपल्या गावातील भूमीपूजनाचा मान महिलांना दिला, ही अभिमानाची गोष्ट असून महिला सक्षमीकरण करणे काळाची गरज आहे.
विकासकामासाठी आणखी निधी देऊ : शेवाळेवाडी येथील अंतर्गत रस्ते विकासकामासाठी दहा लाखांचा निधी टाकला असून अजून गरज भासल्यास निधी देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही डॉ. भोसले यांनी यावेळी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती : या कार्यक्रमासाठी डी. जी. शेवाळे, व्ही. के. शेवाळे, उद्योजक रमेश शेवाळे, जी. पी. शेवाळे, जयवंत शेवाळे, युवराज शेवाळे, रघुनाथ शेवाळे, अशोक शेवाळे, उत्तम शेवाळे, मधुकर शेवाळे, धनाजी देगावकर, नरेश शेवाळे, आनंदराव शेवाळे दादासो शेवाळे, अरविंद देगावकर, बाजीराव शेवाळे, तुकाराम चौगुले, गोपाल देगावकर, पंकज शेवाळे, दीपक शेवाळे बापूराव, भीमराव शेवाळे, अजय शेवाळे, धनंजय शेवाळे, सनी शेवाळे, अमर शेवाळे, विजय शेवाळे, जनार्दन शेवाळे मान्यवर उपस्थित होते.
ग्रामविकास मंडळाच्या गणेशाचे दर्शन : यावेळी डॉ. अतुल भोसले यांनी ग्रामविकास मंडळ, शेवाळेवाडीच्या गणेशाचे दर्शन घेतले. तसेच मंडळातील कार्यकर्त्यांची विचारपूस केली. यावेळी मारुती शेवाळे, पंकज पाटील यांसह मान्यवर उपस्थित होते. सागर शेवाळे यांनी आभार मानले.
शेवाळेवाडीत पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रम : उंडाळेपासून शेवाळवाडी ही स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यानंतर शेवाळेवाडी येथे डॉ. अतुल भोसले यांचा आजपर्यंत कारकीर्दीतील पहिलाच जाहीर कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.