रणजितनाना पाटील मित्र परिवाराचा सलग दहाव्या वर्षी उपक्रम
कराड/प्रतिनिधी : – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक व सामाजिक कार्यकर्ते रणजितनाना पाटील व मित्र परिवाराच्या वतीने मंगळवारी १७ रोजी अनंत चतुर्दशीला कृष्णा घाटावर येणाऱ्या गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी सुमारे ५० हजार भाविकांना महाप्रसाद देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
रणजितनाना पाटील मित्र परिवारातर्फे गेली नऊ वर्षे विसर्जन दिवशी या महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे विसर्जनाला आलेल्या भाविकांची मोठी सोय होते या यावर्षी सुमारे 50 हजार भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे त्यासोबत महाप्रसादासोबत पाण्याची बाटली ही देण्यात येणार आहे.
मंगळवारी १७ रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ११ वाजता महाप्रसाद कार्यक्रम सुरू होणार असून तो पहाटेचा शेवटचा गणपती विसर्जन होईपर्यंत सुरू राहणार आहे.
कराड शहर व तालुक्यातील गणेश भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वराज्य रक्षक धर्मवीर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे संस्थापक सचिव रणजित नाना पाटील यांनी केले आहे.