पुणे येथे डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशनकडून सन्मान; देशभरातील मान्यवरांची उपस्थिती
कराड/प्रतिनिधी : –
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांना साखर उद्योगातील उल्लेखनीय व भरीव योगदानाबद्दल ‘डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशन’च्यावतीने अत्यंत प्रतिष्ठेचा ‘साखर उद्योग गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला होता.
वितरण सोहळा : आज पुणे येथील हॉटेल जे.डब्ल्यू. मॅरियटमध्ये आयोजित शानदार सोहळ्यात राज्याचे माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते डॉ. सुरेश भोसले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
परिषदेचे उद्घाटन : ‘डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशन’च्या ७१ व्या वार्षिक परिषदेचे आणि ‘शुगर एक्स्पो इंडिया’चे आयोजन पुणे येथे करण्यात आले होते. आ. पाटील यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती : याप्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री दिलीपराव देशमुख, राजेश टोपे, श्रीमंत पाटील, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे, एस.एस. इंजिनिअर्सचे व्यवस्थापकीय संचालक एस.बी. भड, महुआ सहकारी खंड उद्योगचे अध्यक्ष एम. के. पटेल, शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष संजय अवस्थी, साऊथ इंडिया शुगर ॲन्ड शुगरकेन टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष आर.व्ही. कुंभार, नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक अरविंदकुमार रावत, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक संभाजी कडू-पाटील, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष एस.एस. शिरगावकर, उपाध्यक्ष एस. डी. भोकरे, सी. जी. माने आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. सुरेश भोसले यांच्या कार्याचा विशेष गौरव करत, त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला कृष्णा कारखान्याचे संचालक लिंबाजी पाटील, धोंडीराम जाधव, जगदीश जगताप, बाबासो शिंदे, संभाजी पाटील, बाजीराव निकम, बाजीराव थोरात, अरविंद पाटील, सुनिल पाटील, बाळासो जगताप, सत्यजित पाटील, अविनाश खरात, आनंदा खबाले, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, माजी संचालक संजय पाटील, दीपक जाधव, संजय शेवाळे यांच्यासह देशभरातील साखर उद्योगातील नामवंत तज्ज्ञ, तंत्रज्ञ, उद्योगपती आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.