Edition

आप्पासाहेबांच्या कार्याचा वारसा ग्रामीण विकासासाठी आजही प्रेरणादायी – भरत पाटील 

Share करें

✓ Link copy हो गया!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांच्या स्मृतींना अभिवादन

कराड/प्रतिनिधी : –

सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला नवी दिशा देणारे आणि कृष्णा उद्योग समूहाच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावणारे सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (भारत सरकार)चे स्वतंत्र संचालक भरत पाटील (नाना), कराडचे माजी नगरसेवक हनुमंतराव पवार, बापूसाहेब सावंत, आप्पा सावंत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

विकासाची संधी मिळाली : स्व. जयवंतराव भोसले यांनी सहकार, उद्योग, शेती, आरोग्य, शिक्षण आणि समाजकारण या विविध क्षेत्रांत भरीव योगदान देत ग्रामीण विकासाची व्यापक संकल्पना प्रत्यक्षात आणली. त्यांच्या नेतृत्वातून उभ्या राहिलेल्या विविध संस्था आणि उपक्रमांमुळे अनेकांना विकासाची संधी मिळाली.

…हीच खरी आदरांजली ठरेल : आप्पासाहेबांनी जपलेली सहकाराची मूल्ये, सामाजिक बांधिलकी आणि सर्वसामान्यांच्या विकासाची भूमिका आजच्या पिढीसाठी दिशादर्शक आहे. त्यांच्या कार्याचा हा समृद्ध वारसा पुढे नेणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. उपस्थितांनी त्यांच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail