सर्वोत्तम बातम्या - Jan Swarashtra https://janswarashtra.com Latest News | Top News | Breaking News Fri, 08 Nov 2024 15:53:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.2 https://janswarashtra.com/wp-content/uploads/2024/08/cropped-Add-a-heading-5-32x32.png सर्वोत्तम बातम्या - Jan Swarashtra https://janswarashtra.com 32 32 महाराष्ट्रावरील गद्दारीचा डाग ही अमित शहांची देण  https://janswarashtra.com/archives/2299 https://janswarashtra.com/archives/2299#respond Fri, 08 Nov 2024 14:51:36 +0000 https://janswarashtra.com/?p=2299 पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात; समोरासमोर या, आम्ही काय केले ते सांगतो  कराड/प्रतिनिधी : – महाराष्ट्राची गद्दारांचे राष्ट्र अशी झालेली ओळख ही अमित शहांची देण आहे, असा घणाघात पंतप्रधान कार्यालयाचे माजी मंत्री तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केला. टीकेला टीकेने प्रत्युत्तर : विंग (ता. कराड) येथील एका सभेत केंद्रीय ... Read more

The post महाराष्ट्रावरील गद्दारीचा डाग ही अमित शहांची देण  first appeared on Jan Swarashtra.

]]>

पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात; समोरासमोर या, आम्ही काय केले ते सांगतो 

कराड/प्रतिनिधी : –

महाराष्ट्राची गद्दारांचे राष्ट्र अशी झालेली ओळख ही अमित शहांची देण आहे, असा घणाघात पंतप्रधान कार्यालयाचे माजी मंत्री तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केला.

टीकेला टीकेने प्रत्युत्तर : विंग (ता. कराड) येथील एका सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस, तसेच शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. त्यावर प्रसारमाध्यमांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या उत्तरादाखल पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.

मग विकासाच्या बाता मारा : एकेकाळी महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगत श्री. चव्हाण म्हणाले, महाराष्ट्र दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत सध्या 11 व्या क्रमांकावर आहे. याला दहा वर्षांतील महायुती सरकारची सुमार कामगिरीच जबाबदार आहे. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, दिल्ली, गोवा ही राज्ये महाराष्ट्राच्या पुढे आहेत. हे चुकीचे असल्यास त्यांनी सांगावे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात ते कबूल केले आहे. त्याचा व्हिडिओ शहांनी पहावा आणि मग विकासाच्या बाता माराव्यात. 

सगळे उद्योग गुजरातला पळवले : महाराष्ट्रात सध्या सुशिक्षित, बेरोजगारांची फौज निर्माण झाली असल्याचे सांगत श्री. चव्हाण म्हणाले, शहा आणि त्यांच्या नेत्यांनी सगळे उद्योग गुजरातला पळवले आणि तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस तोंडाला पट्टी बांधून गप्प राहिले. मुंबई – अहमदाबाद ही सव्वालाख कोटींची बुलेट ट्रेन केली. याची कोणी मागणी केली होती. केवळ गुजरातला महाराष्ट्राच्या डोक्यावर बसवण्यासाठी हा उद्योग त्यांनी केला. यासाठी कराड – चिपळूण हा मंजूर झालेला रेल्वे प्रकल्प रद्द करून त्याचा निधी बुलेट ट्रेनकडे वळवण्यात आला. तसेच अमित शहा यांनी उपस्थित केलेल्या 370 कलम, वक्फ बोर्ड, जम्मू-काश्मीरचा प्रश्न या मुद्द्यांचाही त्यांनी समाचार घेतला. 

अमित शहा यांना दिले खुले आव्हान : काँग्रेसने सत्ताकाळात काय केले? असे अमित शहा यांच्यासारख्या एका जबाबदार व्यक्तींनी केलेले वक्तव्य हास्यास्पद असल्याचे सांगत श्री. चव्हाण म्हणाले, यावर खरंच बोलायचे असेल, तर मी मनमोहन सिंग सरकारने काय केले, ते सांगतो. त्यासाठी समोरासमोर या!, असे खुले आव्हानही पृथ्वीराज चव्हाण यांनी अमित शहा यांना दिले. 

विकासकामे हवेतून पडली का? 

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात तब्बल 700 कोटींचे भूकंप संशोधन केंद्र मी आणले. तसेच स्वतंत्र आरटीओ कार्यालय, प्रशासकीय इमारत, कराडचे बस स्थानक आदी कामे हवेतून पडली? की ती अमित शहांनी आणली? असा टोलाही आ. चव्हाण यांनी यावेळी अमित शहा यांना लगावला. 

झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव नागरिकांनी स्वीकारला नाही 

मी मुख्यमंत्री असताना कराडमधील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव नागरिकांसमोर मांडला होता, असे सांगताना श्री. चव्हाण म्हणाले, मी मांडलेला प्रस्ताव नागरिकांनी स्वीकारला नाही. कराडला नगराध्यक्षा भाजपच्या होत्या. महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचा होता. केंद्रात पंतप्रधानही भाजपचेच होते. असे असताना तुम्ही का निर्णय घेतला नाही? असा प्रतिसवालही आ. चव्हाण यांनी अमित शहा यांना केला.

The post महाराष्ट्रावरील गद्दारीचा डाग ही अमित शहांची देण  first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/2299/feed 0
उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला https://janswarashtra.com/archives/2292 https://janswarashtra.com/archives/2292#respond Fri, 08 Nov 2024 14:02:19 +0000 https://janswarashtra.com/?p=2292 अमित शहा; राहुल गांधी, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर डागले टीकास्त्र  कराड/प्रतिनिधी : – 2019 च्या निवडणुकीत हिंदुत्वाच्या झेंड्याखाली भाजप – शिवसेनेने निवडणूक लढवली. परंतु, 370 कलम आणि राम मंदिराला विरोध करणाऱ्यांसोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी विश्वासात केला. हिंदुत्वाला ठोकर मारत हिंदुत्वालाच आतंकवादी म्हणणाऱ्या माणसांसोबत जाताना त्यांना लाज वाटली नाही, अशी जहरी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित ... Read more

The post उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला first appeared on Jan Swarashtra.

]]>
अमित शहा; राहुल गांधी, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर डागले टीकास्त्र 

कराड/प्रतिनिधी : –

2019 च्या निवडणुकीत हिंदुत्वाच्या झेंड्याखाली भाजप – शिवसेनेने निवडणूक लढवली. परंतु, 370 कलम आणि राम मंदिराला विरोध करणाऱ्यांसोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी विश्वासात केला. हिंदुत्वाला ठोकर मारत हिंदुत्वालाच आतंकवादी म्हणणाऱ्या माणसांसोबत जाताना त्यांना लाज वाटली नाही, अशी जहरी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. तसेच यावेळेला आम्ही ती चूक करणार नाही. महाराष्ट्रात महायुतीलाच बहुमत मिळेल, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी यांनी व्यक्त केला. 

विंग : डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेला झालेली अलोट गर्दी. 

डॉ. अतुल भोसले यांच्यासाठी प्रचारसभा : विंग (ता. कराड) येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी खा. उदयनराजे भोसले, उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी आ. आनंदराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

राहुल गांधींचा घेतला समाचार : अग्निवीरांबाबत चुकीचे बोलणाऱ्या राहुल गांधींच्या भूल थापांना युवकांनी बळी पडू नये, असे आवाहन करत ना. शहा म्हणाले, त्यांच्याप्रमाणे खोटे वायदे न करतात आम्ही महाराष्ट्रातील सर्व अग्निवीरांना केंद्र व राज्य सरकारची पेन्शन मिळेल अशी नोकरी देणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. सातारा ही वीरांची भूमी असून येथील वीरांना आणि वीरमातांना मी प्रणाम करतो. मोदींनी ‘वन रँक वन पेन्शन’च्या माध्यमातून एक लाख 55 हजार कोटी रूपये जवानांच्या खात्यावर जमा केल्याची त्यांनी सांगितले.

विंग : विरोधकांवर टीकास्त्र डागताना केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा. 

केंद्रात मंत्रिपदे भुषवणाऱ्यांनी काय केले? : शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा समाचार घेताना ना. शहा म्हणाले, 50 वर्षे सत्तेत असताना, तसेच केंद्रात दहा वर्षे मंत्रिपदे भुषवणाऱ्या शरद पवार आणि प्रधानमंत्री कार्यालयात मंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रासाठी काय केले. काँग्रेसचे केंद्रीय अध्यक्ष खरगे हे त्यांच्या नेत्यांना लोकांना शब्द देताना तो पूर्ण करता आला पाहिजे हे समजून द्या, असे स्पष्टपणे सांगतात. मग असा पक्ष महाराष्ट्राचा विकास काय करणार, असा टोलाही त्यांनी यावेळी लागला.

शरद पवारांना विकासकामे दाखवण्याचे आव्हान : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 कोटी गरिबांना पक्के घर देण्याचे काम केले. तसेच समृद्धी महामार्ग, मुंबई – पुणे कॉरिडॉर, अटल सेतू, मुंबई, पुणे, नागपूर मेट्रो, कृष्णा, नीरा नदी योजना आदी अनेक विकासकामे केल्याचे सांगत ना. शहा म्हणाले, शरद पवारांनी आघाडीच्या माध्यमातून एक काम केल्याचे त्यांनी सांगावे. आम्ही केलेली कामे मी पुराव्यानिशी दाखवतो, असे खुले आव्हानही त्यांनी शरद पवार यांना दिले. तसेच यूपीए सरकारच्या काळात दहा वर्षांमध्ये शरद पवारांनी महाराष्ट्राला केवळ एक लाख 91 हजार कोटी रूपये दिले. मात्र, मोदींनी दहा वर्षांत 10 लाख 15 हजार 890 कोटी रुपये दिल्याचेही त्यांनी सांगितले.

मोदींची गॅरंटी

पी. एम. किसान योजनेचा हप्ता 15 हजारांवर नेणार, आयुष्मान भारत योजनेमार्फत पाच लाखांपर्यंत मोफत उपचार, 70 वर्षांवरील नागरिकांना आणखी पाच लाख रुपये, तसेच प्रधानमंत्री योजनेतून पाच लाख रुपये असे 15 लाख रुपयांचे मोफत उपचार मिळणार, दोन लाख नागरिकांना हर घर जल, सातारा जिल्ह्यात उज्वला योजनेतून एक लाख 65 हजार गॅस कनेक्शन वितरण, कराड विमानतळासाठी 221 कोटी निधी मंजूर, नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी निधी, वयोवृद्ध योजनेतून पेन्शन, लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रतिमहा, 10 लाख युवकांना नोकरी, अंगणवाडी, आशा सेविकांना 15 हजार रुपये मानधन, ही मोदींची गॅरंटी असल्याचे ना. शहा यांनी सांगितले. 

The post उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/2292/feed 0
अतुलबाबांच्या मंत्रिपदासाठी कटिबद्ध https://janswarashtra.com/archives/2284 https://janswarashtra.com/archives/2284#respond Fri, 08 Nov 2024 12:22:41 +0000 https://janswarashtra.com/?p=2284 अमित शहा यांची ग्वाही; राज्यात महायुतीचे सरकार येईल  कराड/प्रतिनिधी : –  गत विधानसभेत डॉ. अतुल भोसले यांना केवळ साडेचार हजार मते कमी मिळाल्याची सल आजही मनात आहे. या निवडणुकीत तुम्ही ती कसर भरून काढत त्यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करा, मी त्यांना मंत्रीपद देण्यासाठी कटीबद्ध आहे, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा यांनी दिली. ... Read more

The post अतुलबाबांच्या मंत्रिपदासाठी कटिबद्ध first appeared on Jan Swarashtra.

]]>

अमित शहा यांची ग्वाही; राज्यात महायुतीचे सरकार येईल 

कराड/प्रतिनिधी : – 

गत विधानसभेत डॉ. अतुल भोसले यांना केवळ साडेचार हजार मते कमी मिळाल्याची सल आजही मनात आहे. या निवडणुकीत तुम्ही ती कसर भरून काढत त्यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करा, मी त्यांना मंत्रीपद देण्यासाठी कटीबद्ध आहे, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा यांनी दिली.

विंग : महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या सभेला महिलांनी केलेली अलोट गर्दी. 

महायुतीची विराट सभा : विंग (ता. कराड) येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. या सभेला कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक तसेच महिला भगिनींची असलेली अलोट गर्दी लक्षवेधी ठरली.

मान्यवरांची उपस्थिती : या विचारमंचावर खासदार उदयनराजे भोसले, उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी आ. आनंदराव पाटील, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भरतनाना पाटील, विक्रम पावसकर, कराड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. 

लोकप्रतिनिधींनी कराड दक्षिणसाठी काय केले? : प्रधानमंत्री कार्यालयात मंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी, तसेच तब्बल पन्नास वर्षे लोकप्रतिनिधीत्व करणाऱ्यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी काय केले, असा सवाल उपस्थित करत अमित शहा म्हणाले, असे नेते आणि त्यांचा पक्ष कराड दक्षिणचा विकास काय करणार, याचाही जनतेने विचार केला पाहिजे.

कराड दक्षिणमध्ये कमळ फुलवा : राज्यात आता महायुतीचे सरकारी येणार असून या सरकारमध्ये तुम्ही कराड दक्षिणमध्ये कमळ फुलवून अतुलबाबांना विजयी करून पाठवा. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक प्रत्येक लाभार्थ्याला पक्के घर देऊन येथील झोपडपट्टी हटवणार. तसेच त्याच्या उद्घाटनाला मी कराडला येणार असून स्वतःच्या हाताने लाभार्थ्यांना पक्क्या घरांच्या चाव्या देणार असल्याचा शब्दही त्यांनी यावेळी दिला.

एमआयडीसीच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक : भाजपच्या माध्यमातून कराडला प्लाय ओव्हर ब्रिज होत असून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कराडच्या स्टेडियमलाही मोठा निधी मिळाला असल्याचे श्री. शहा यांनी सांगितले. तसेच अतुलबाबांच्या कृष्णा हॉस्पिटल, कृष्णा साखर कारखाना, कृष्णा बँक, जयवंतराव भोसले पतसंस्था आदी सहकारी संस्थांच्या माध्यमातून युवकांना रोजगार निर्मिती झाली आहे. आता राज्य सरकारही कराड दक्षिणमध्ये एमआयडीसीच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक करणार असून युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

विंग : उपस्थित अलोट जनसमुदायास संबोधित करताना महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले. 

झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे द्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील महायुतीकडून युवकांना मोठी अपेक्षा असल्याचे सांगत डॉ. अतुल भोसले म्हणाले, कराडची एमआयडीसीला फाईव्ह स्टारचा दर्जा द्यावा, येथील सहकारी सिंचन योजनांचे पुनर्गठन करून त्यांना उर्जिताववस्था द्यावी, येथील लोकप्रतिनिधी माजी मुख्यमंत्र्यांच्या घरालगत पाटण कॉलनीतील झोपडपट्टीवाशीयांची दहा वर्षांपासून पक्क्या घरांची मागणी आहे. परंतु, ती त्यांना पूर्ण करता आली नाही. मात्र, आपण प्रधानमंत्री आवास योजनेतून कराडच्या स्टेडियमलगत, पाटण कॉलनी, तसेच मलकापुरातील झोपडपट्टीवाशीयांना पक्की घरे द्यावीत, अशी मागणी डॉ. अतुल भोसले यांनी अमित शहा यांच्याकडे केली. 

दक्षिणेत कमळ फुलवणार 

भारतीय जनता पार्टीने माझ्यावर सातारा लोकसभा मतदारसंघाचा प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली होती. छत्रपती उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून पहिल्यांदा भाजपचा खासदार म्हणून विजय करून, कराड दक्षिणमधून मोठे मताधिक्य देऊन ती जबाबदारी मी पूर्ण केली आहे. आता कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मागच्या वेळची कसर भरून काढत यावेळी कमळ फुलवणारच, असा शब्दही डॉ. अतुलबाबा भोसले यांनी यावेळी अमित शहा यांना दिला. 

The post अतुलबाबांच्या मंत्रिपदासाठी कटिबद्ध first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/2284/feed 0
दक्षिणेत काँग्रेस सरस, भाजपलाही सुवर्णसंधी  https://janswarashtra.com/archives/1837 https://janswarashtra.com/archives/1837#respond Sat, 19 Oct 2024 18:19:43 +0000 https://janswarashtra.com/?p=1837 विधानसभा रणांगण; दोन्ही पक्षांना एकदिलीची गरज, फंद-फितुरी रोखण्याचे आव्हान  राजेंद्र मोहिते / कराड : –   कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची रयत संघटना, इंद्रजीत मोहिते यांना मानणारा गट आणि राष्ट्रवादीचे अविनाश मोहिते यांच्या मतांची गोळाबेरीज पाहता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत सध्या काँग्रेस सरस असल्याचे चित्र आहे. तर याच ... Read more

The post दक्षिणेत काँग्रेस सरस, भाजपलाही सुवर्णसंधी  first appeared on Jan Swarashtra.

]]>

विधानसभा रणांगण; दोन्ही पक्षांना एकदिलीची गरज, फंद-फितुरी रोखण्याचे आव्हान 

राजेंद्र मोहिते / कराड : –  

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची रयत संघटना, इंद्रजीत मोहिते यांना मानणारा गट आणि राष्ट्रवादीचे अविनाश मोहिते यांच्या मतांची गोळाबेरीज पाहता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत सध्या काँग्रेस सरस असल्याचे चित्र आहे. तर याच मतदारसंघात डॉ. अतुल भोसले यांच्या माध्यमातून 2014, 2019 आणि आता 2024 पर्यंत भाजपची वाढलेली मतांची टक्केवारी, लोकसभेला छत्रपती उदयनराजेंना दक्षिणेतून मिळालेले मताधिक्य, माजी आमदार आनंदराव पाटील यांचा गट आणि शहर भाजप, पावसकर गट व संघ भाजपमध्ये एकदिली राहिल्यास दक्षिणेत भाजपलाही मोठी सुवर्णसंधी आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु, राज्यात 2014 मध्ये झालेल्या राजकीय घडामोडीनंतर सलग सातवेळा आमदार राहिलेल्या काँग्रेसच्या माजी मंत्री स्व. विलासकाका पाटील-उंडाळकर आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात झालेल्या लढतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी बाजी मारली. तर 2019 मध्ये औटघटकेला विलासकाका आणि पृथ्वीराजबाबांमध्ये समेट झाल्याने अपक्ष लढलेल्या उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना मात देत पृथ्वीराज चव्हाण यांनी अपेक्षित विजय मिळवला. या दोन्हीवेळी मतदारसंघ काँग्रेसकडेच राहिला, हे महत्त्वाचे.

दरम्यान, 2014 च्या निवडणुकीत झालेल्या तिरंगी लढतीत भाजपमधून नशीब आजमावणाऱ्या डॉ. अतुल भोसले यांना दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या विलासकाकांपेक्षा केवळ 1,792 मते कमी मिळाली असली, तरीही दोन दिग्गजांच्या तुलनेत ती दखलपात्र म्हणून नोंदली गेली. या निवडणुकीत ते 18,260 मतांनी विजयापासून दूर राहिले. तर 2019 च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेत केवळ 9,130 मतांनी पराभव पत्करावा लागलेल्या डॉ. अतुल भोसले यांनी माजी मुख्यमंत्र्यांना तगडी टक्कर दिल्याने राज्यालाही त्यांची दखल घ्यावी लागली. या दोन्ही निवडणुकांत डॉ. भोसले यांच्या मतांमध्ये 24,554 इतकी झालेली घसघशीत वाढ तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना मिळालेल्या 29,401 मतांवरून अधोरेखित होते.

आता 2024 मध्येही पृथ्वीराज चव्हाण आणि डॉ. अतुल भोसले यांच्यातच थेट लढत होणार आहे. त्यामुळे एकंदरीत काँग्रेस पक्ष म्हणून दक्षिणेत मतांचा मतगठ्ठा आहे. तो एकत्र ठेवण्यासाठी रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली अन्यायाची भावना दूर करत काँग्रेसच्या या दोन्ही गटांत एकदिली राखण्याचे आव्हान पृथ्वीराज चव्हाण यांच्यापुढे आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये डॉ. अतुल भोसले यांचे वाढणारे वर्चस्व पाहता त्यांना अंतर्गत सुप्त विरोध करणाऱ्या भाजपच्याच अन्य गटांमध्ये अद्याप धुसफूस चालू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येथेही एकदिली नांदवत फंद-फितुरी रोखण्याचे मोठे आव्हान डॉ. अतुल भोसले यांच्यापुढेही उभा आहे. जो ही आव्हाने पेलण्यास यशस्वी झाला; त्याचाच गुलाल, अशीही दक्षिणेत चर्चा आहे.

पृथ्वीराज चव्हाण : प्लस पॉईंट 

  • मुख्यमंत्री असताना तब्बल 1800 कोटींची केलेली विकासकामे

  • स्वच्छ प्रतिमा

  • महाविकास आघाडीतून मुख्यमंत्री म्हणून पुन्हा संधी मिळण्याची शक्यता

  • कराड आणि मलकापूर शहरातील नागरिकांचा मिळणारा पाठिंबा

  • आमदार म्हणून मतदारसंघात केलेली विकासकामे

  • केंद्र व राज्यातील गाढा अनुभव

  • पारंपारिक मतदार राखून ठेवण्यात यश

मायनस पॉईंट : 

  • पहिल्या फळीतील ठराविक पदाधिकाऱ्यांवर मतदार

  • नवीन, युवा कार्यकर्त्यांकडे जबाबदारीचा अभाव

  • ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या संपर्कात सातत्य नसणे

डॉ. अतुल भोसले : प्लस पॉईंट 

  • तरुण, युवा नेतृत्व व युवकांमध्ये वाढती क्रेझ

  • जनसंपर्कात सातत्य

  • पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पाठबळ

  • कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून युवकांच्या हाताला काम

  • विविध शासकीय योजनांचा जनतेला लाभ

  • कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून कोविडमध्ये केलेले काम

  • वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून आणलेला सुमारे 700 कोटींचा विकासनिधी

मायनस पॉईंट : 

  • स्थानिक पातळीवरील दोन गटांतील मारक राजकारण

  • स्वपक्षातून होणारा सुप्त विरोध

  • कराड उत्तरमध्ये दखलपात्र समर्थक गटाचा अभाव

The post दक्षिणेत काँग्रेस सरस, भाजपलाही सुवर्णसंधी  first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/1837/feed 0
जगाला भारताकडून विवेकानंदांसारख्या तरुणांची अपेक्षा https://janswarashtra.com/archives/1536 https://janswarashtra.com/archives/1536#respond Mon, 07 Oct 2024 12:47:06 +0000 https://janswarashtra.com/?p=1536 कराडच्या शारदीय व्याख्यानमालेत राहुल गिरी यांचे प्रतिपादन; माय, माती आणि माणुसकीला विसरू नका कराड/प्रतिनिधी : – स्वामी विवेकानंद हे संपूर्ण जगासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. त्यांचे आचार, विचार, संस्कार, देशप्रेम आपणा सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहेच. परंतु, त्यांची अमोघ वाणी, विचार, बुद्धिमत्ता, सर्वसमभाव आणि चारित्र्यसंपन्नता संपूर्ण जगाला मोहित करते. अशा तेजस्वी, ज्ञानी तरुणांची आज जगाला भारताकडून अपेक्षा ... Read more

The post जगाला भारताकडून विवेकानंदांसारख्या तरुणांची अपेक्षा first appeared on Jan Swarashtra.

]]>
कराडच्या शारदीय व्याख्यानमालेत राहुल गिरी यांचे प्रतिपादन; माय, माती आणि माणुसकीला विसरू नका

कराड/प्रतिनिधी : –

स्वामी विवेकानंद हे संपूर्ण जगासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. त्यांचे आचार, विचार, संस्कार, देशप्रेम आपणा सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहेच. परंतु, त्यांची अमोघ वाणी, विचार, बुद्धिमत्ता, सर्वसमभाव आणि चारित्र्यसंपन्नता संपूर्ण जगाला मोहित करते. अशा तेजस्वी, ज्ञानी तरुणांची आज जगाला भारताकडून अपेक्षा आहे, असे प्रतिपादन युवा व्याख्याते राहुल गिरी यांनी केले.

शारदीय व्याख्यानमालेचे चौथे पुष्प : कराड नगरपरिषद आणि नगरवाचनालयातर्फे आयोजित 92 व्या शारदीय व्याख्यानमालेत रविवार, दि. 6 रोजी चौथे पुष्प गुंफताना ‘तरुणाई : पालकांची आशा आणि भविष्याची दिशा’ ते या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, माजी नगरसेवक सौरभ पाटील, प्रा. बी. एस. खोत, नायब तहसीलदार युवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

हीच खरी कराडची ओळख आणि कर्तृत्व : कराड व साताऱ्याचे कर्तृत्व सांगताना श्री. गिरी म्हणाले, साताऱ्यात आल्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण आणि पी. डी. पाटील साहेब यांची आठवण होते. हिमालयावर संकट आल्यावर यशवंतराव चव्हाण यांच्या रूपाने कराड, साताऱ्याचा सह्याद्री खंबीरपणे मदतीला धावून जातो, हीच खरी कराडची ओळख आणि कर्तृत्व आहे. आजच्या तरुणाईच्या खांद्यावरच या युगाचे भविष्य आहे. परंतु, शाळा, विद्यालयातून महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणाईची पावले आज व्यसनाधीनतेकडे वळतात, ही मोठी चिंतेजी बाब आहे. मुलांच्या चुकांवर पांघरून घातल्याने मुलांच्या आयुष्याची दिशा आपणच भरकटवतो, याची जाणीव ठेवून मुलांची पावले प्रेयसाकडून श्रेयसाकडे कशी जातील, हे पालकांनी पहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

माणूस त्याच्या विचारांवरून तरुण ठरतो : तरुण कोणाला म्हणावं? हे सांगताना ते म्हणाले, लेकरांची लहान वयातच भविष्याची पावले पडतात. राजमाता जिजाऊंनी शिवरायांच्या भविष्याला कशी दिशा दिली, हे आई-वडिलांनी जाणून मुलांवर संस्कार केले पाहिजेत. ज्या माणसाला पडल्यावर उठताना कोणाचातरी आधार घ्यावा लागतो, त्याला पडल्यावर कधीही उडता येत नाही. माणूस त्याच्या विचारांवरून तरुण ठरतो. जो कुटुंबाला, समाजाला तारण्याचे काम करतो, तोच खरा तरुण आहे. 

भावनांची धार बोथट होत चाललीये : आजची तरुणाई सोशल माध्यमांमध्ये बुडाली असून त्यांच्या भावनांची धार बोथट होत चाललीये. कुटुंबातील संवाद कमी झाल्याने ओठांवरील संवाद बोटांवर आलाय. मोबाईल, सोशल माध्यमे तरुणांवर आधिराज्य गाजवतोय. यातून अतिरेक होते का? हे पाहणेही महत्त्वाचे आहे. एखादी गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त झाल्यावर त्याचे विष तयार होते. त्यामुळे तरुणांनी मोबाईलचा अतिवापर व गैरवापर टाळावा. 

छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श ठेवा : तरुणाईने आदर्श कोणाला मानावे! हे सांगताना ते म्हणाले, आज नवीन गोष्टींची, विचारांची उत्पत्ती होताना दिसत नाही. पूर्वी मुलांपुढे तसे आदर्शही होते. आज आई-वडीलचं मुलांना तुझे आदर्श कोण आहेत? हे विचारही नाहीत. बहुतांशी मुलांचे चित्रपटातील नायक, खलनायक हेच आदर्श असल्याचे दिसते. परंतु, आज तरुणाईने काल्पनिक आदर्श ठेवण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श ठेवावा. आई-वडील, पालक मुलांना हेच सांगायला कुठेतरी कमी पडताहेत. हल्लीचे आई-वडील मुलांकडून फक्त पैसे कमवण्याची अशा करतात. त्यामुळे मुलांच्या आयुष्याची दिशा बदलते. खरेतर, आजच्या तरुणाईने युगपुरुषांचे विचार पुढे नेण्याचे काम करायला हवे. भारतीय तरुणांकडून जगाला खूप आशा आहेत. असे सांगून श्री गिरी म्हणाले, जग गाजवायचे सामर्थ्य आपल्या तरुणांमध्ये असून त्यांनी देशाची यशस्वी परंपरा चालू ठेवली पाहिजे. आपल्याला त्यागाची परंपरा आहे. भोगाची नव्हे. आजच्या पिढीला तो त्याग शिकवण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

आई-वडील, कुटुंब आणि समाजाचाही उद्धार करा : आज्ञाधारक शिष्य आणि मुले कशी असावीत हे सांगताना ते म्हणाले, श्रीराम व राजा दशरथ, राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद व रामकृष्ण परमहंस अशा आज्ञाधारक शिष्य आणि मुलांची आज जगाला गरज आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी एका युवकाला दिलेला सल्ला सांगताना ते म्हणाले, एखाद्याचा कार्यकर्ता बनण्यापेक्षा शिक्षण घेऊन यशस्वी व्हा. स्वतःसह आई-वडील, कुटुंब आणि समाजाचाही उद्धार करा. राजकारणात, समाजकारणात जरूर या. पण त्याआधी स्वतःच्या पायावर उभे रहा, असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी तरुणाईला दिला.

आई-वडिलांची स्वप्नपूर्ती करा : आज आई-वडिलांपेक्षा कुठल्यातरी फुटकळ नेत्याचा मुलं आदर करताना दिसतात. शिवरायांनी जसे स्वराज्य निर्मितीतून जिजाऊंच्या डोळ्यातले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले, तसे तरुणाईनेही आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यातले स्वप्न पूर्ण करून स्वराज्य निर्मावे, असे मौलिक मार्गदर्शनही त्यांनी यावेळी केले. तसेच आजची मुले आई-वडिलांना तुम्ही माझ्यासाठी काय केले, मला काय दिले, हे विचारतात. यावेळी शहाजीराजे आणि शिवाजी महाराजांचे उदाहरण देत ते म्हणाले, ज्या शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले, त्यांना शहाजीराजांनी काय दिले होते, असा आई-बापानेही पोरांना प्रतिप्रश्न करावा. आज अनेक मुले परिस्थितीचे भांडवल बनवतात. परंतु, एका अपयशाने जग संपत नाही. याबाबत एक मौलिक उदाहरण देऊन ते म्हणाले, अपयश हीच यशाची पहिली पायरी असते. मुलांनाही परिस्थितीवर मात करून मोठे होता आले पाहिजे. मुलींना काही अटी घालण्यापेक्षा मुलांचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्नही प्रत्येक आई-वडील, पालकांनी करायला हवा. निगेटिव्ह बोलण्यापेक्षा त्यांनी मुलांमध्ये सकारात्मकतेची ऊर्जा निर्माण करावी. शिक्षणाकडे नीट बघून त्याचा खरा अर्थ समजून घ्या. माणसातले माणूसपण समजवण्याचे काम शिक्षणाने केले असून शिक्षणाचा खरा अर्थ माणूसपण रुजवणे हा आहे, हे मुलांनी, पालकांनी समजून घ्यावे. 

सोशल माध्यमांचा उपवास करा

आजची पिढी आपल्या यशाचे मोजमाप फेसबुक, इन्स्टावर टाकलेल्या फोटोवरील कमेंट आणि लाईक्सवरून ठरवतात. लहान मुलांचा मोबाईल स्क्रीन पाच-सहा तास राहिला, तर त्यांना ब्रेन ट्युमर होऊ शकतो. मोबाईलच्या अतिवापराने गुन्हेगारी वृत्ती वाढते. याउलट त्यातील तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून यशप्राप्ती करावी. याबाबतचे एक हृदयस्पर्शी उदाहरण सांगत ते म्हणाले, तरुणाईने फेसबुक, इन्स्टाच्या लाईक्स वाढवण्यापेक्षा स्वतःची लायकी वाढवून आई-वडिलांना समाजात मान, सन्मान कसा मिळेल, हे पहावे. यासाठी तरुणाईने काही दिवस, महिने, काही वर्षे फेसबुक, इन्स्टासारख्या सोशल माध्यमांचा उपवास करावा, असे आवाहनही राहुल गिरी यांनी यावेळी तरुणाईला केले.

देश, समाजहितासाठी तरुणाईचा वाटा असावा

आज आई-वडील, शिक्षक, पालकांनी तरुणाईच्या खांद्यावर काहीतरी दातृत्व देणे गरजेचे आहे. देशाची संपत्ती ही आपली संपत्ती असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हायला हवी, असे सांगत तरुणांनी माय, माती आणि माणुसकीला विसरता कामा नये, असे भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी केले.

The post जगाला भारताकडून विवेकानंदांसारख्या तरुणांची अपेक्षा first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/1536/feed 0
युनेस्को नामांकन पार्श्वभूमीवर प्रतापगडावर स्वच्छता मोहिम  https://janswarashtra.com/archives/1254 https://janswarashtra.com/archives/1254#respond Sat, 21 Sep 2024 17:45:04 +0000 https://janswarashtra.com/?p=1254 लवकरच होणार पाहणी; सह्याद्री प्रतिष्ठानकडून संपूर्ण जिल्ह्यात जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहिम कराड/प्रतिनिधी : – आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह लाखो मावळ्यांच्या त्याग, बलिदान व पराक्रमाचे जिवंत स्मारक असणार्‍या 12 गडकोटांची युनेस्कोकडून नामांकनासाठी निवड करण्यात आली आहे. या सर्व गडकोटांची पाहणी 27 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत होणार असून यात सातारा जिल्ह्यातील ... Read more

The post युनेस्को नामांकन पार्श्वभूमीवर प्रतापगडावर स्वच्छता मोहिम  first appeared on Jan Swarashtra.

]]>
लवकरच होणार पाहणी; सह्याद्री प्रतिष्ठानकडून संपूर्ण जिल्ह्यात जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहिम

कराड/प्रतिनिधी : –

आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह लाखो मावळ्यांच्या त्याग, बलिदान व पराक्रमाचे जिवंत स्मारक असणार्‍या 12 गडकोटांची युनेस्कोकडून नामांकनासाठी निवड करण्यात आली आहे. या सर्व गडकोटांची पाहणी 27 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत होणार असून यात सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले प्रतापगडचा सुद्धा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर सह्याद्री प्रतिष्ठानकडून रविवार, 22 सप्टेंबरला स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील शिवभक्तांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

युनेस्कोकडून 9 किल्ल्यांची पाहणी : स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड, दुसरी राजधानी किल्ले रायगडसह प्रतापगड व अन्य 9 किल्ल्यांची युनेस्कोकडून पाहणी करून आढावा घेतला जाणार आहे. त्यासाठी युनेस्कोचे एक विशेष पथक 27 सप्टेंबरला दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर या किल्ल्यांसह राज्यातील अन्य गडकोटांच्या जतन व संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी, यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानकडून जिल्ह्यातील सर्व दुर्ग संवर्धन संस्थांसह शिवभक्तांना रविवारी होणार्‍या स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

स्वराज्यात गडकोटांचे अनन्यसाधारण महत्त्व : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात गडकोटांचे महत्त्व अनन्यसाधारण असे होते. हेच गडकोट छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह लाखो मावळ्यांच्या त्याग, बलिदान व पराक्रमाचे प्रतिक आहे. त्यामुळे या गडकोटांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी एकत्रितरित्या प्रयत्न करणे आवश्यक आहे. 

गडकोटांचे जतन व संवर्धन ही काळाची गरज : स्वराज्यातील गडकोटांचे जतन व संवर्धन ही काळाची गरज आहे. हीच गरज ओळखून आज राज्यात सह्याद्री प्रतिष्ठानसह अनेक दुर्ग संवर्धन संस्था कार्यरत आहेत. गडकोटांचे पावित्र्य कायम रहावे यासाठी या सर्व दुर्ग संस्था अहोरात्र मेहनत घेत असून या शिवकार्यास हातभार लावणे प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्यच आहे. त्यामुळेच रविवारी होणार्‍या स्वच्छता मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानकडून करण्यात आले आहे. 

सातारा जिल्ह्यात स्वाक्षरी मोहिम…

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानकडून सातारा जिल्ह्यातील कराड, सातारा, कोरेगाव, खटाव, माण, पाटण, वाई, खंडाळा, जावळी यासह प्रत्येक तालुक्यात सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांकडून स्वाक्षरी मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे किल्ले प्रतापगडासह जिल्ह्यातील सर्व गडकोटांच्या जतन व संवर्धनासाठी जनजागृती केली जात आहे. तसेच रविवारी होणार्‍या स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन शिवभक्तांसह युवा पिढीला केले जात आहे.

The post युनेस्को नामांकन पार्श्वभूमीवर प्रतापगडावर स्वच्छता मोहिम  first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/1254/feed 0
सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गात 32 वाघांचे अस्तित्व – गिरीश पंजाबी https://janswarashtra.com/archives/1119 https://janswarashtra.com/archives/1119#respond Sun, 11 Aug 2024 17:32:48 +0000 https://janswarashtra.com/?p=1119 कराडला सह्याद्री व्याघ्र भूप्रदेश संवर्धन परिषद उत्साहात  कराड/प्रतिनिधी : – महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत विस्तारलेल्या सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात तब्बल 32 वाघांचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे. ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’ने कोल्हापूर वन विभाग आणि ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’च्या मदतीने तयार केलेला अहवाल या परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये कर्नाटकमधील 17 आणि गोव्यातील 5 वाघांची संख्या ही ... Read more

The post सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गात 32 वाघांचे अस्तित्व – गिरीश पंजाबी first appeared on Jan Swarashtra.

]]>
कराडला सह्याद्री व्याघ्र भूप्रदेश संवर्धन परिषद उत्साहात 

कराड/प्रतिनिधी : –

महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत विस्तारलेल्या सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात तब्बल 32 वाघांचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे. ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’ने कोल्हापूर वन विभाग आणि ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’च्या मदतीने तयार केलेला अहवाल या परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये कर्नाटकमधील 17 आणि गोव्यातील 5 वाघांची संख्या ही राष्ट्रीय व्याघ्र गणनेच्या अहवालानुसार नोंदवण्यात आली, तर पश्चिम महाराष्ट्रामधील 10 वाघांच्या छायाचित्रांची नोंद आम्ही आमच्या अभ्यासातून केल्याचे ‘डब्लूसीटी’चे वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी यांनी सांगितले.

जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून दि. 2 ऑगस्ट रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या सह्याद्री वन्यजीव संशोधन सुविधा केंद्रातर्फे आयोजित सह्याद्री व्याघ्र भूप्रदेश संवर्धन परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेत ते बोलत होते.

या परिषदेच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूरचे संचालक मणीकंदा रामानुजम होते. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणचे अतिरिक्त महानिरीक्षक नंदकिशोर काळे, वानिकी महाविद्यालय, दापोलीचे अधिष्ठाता डॉ. सतिश नरखेडे, कृष्णा मेडिकल महाविद्यालयाचे कुलसचिव एम. व्ही. घोरपडे होते.

कराड : सह्याद्री व्याघ्र भूप्रदेश संवर्धन परिषदेत सहभागी वन्यजीव संशोधक गिरीष पंजाबी, मणीकंदा रामानुजम, नंदकिशोर काळे, डॉ. सतिश नरखेडे, एम. व्ही. घोरपडे, तसेच मानद वन्यजीव रक्षक, प्राध्यापक, वन्यजीव संशोधक, निसर्गप्रेमी व विद्यार्थी. 

सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात वावर असलेल्या वाघांच्या अस्तित्वाबाबत बोलताना वन्यजीव संशोधक श्री. पंजाबी म्हणाले, सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात वावर असलेया वाघांच्या अस्तित्वाबाबत माहिती घेण्यासाठी ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’ने कोल्हापूर वन विभाग आणि ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’च्या मदतीने एक अहवाल तयार करण्यात आला होता. त्यामध्ये तब्बल 32 वाघांचा वावर असल्याचे आढळून आले आहे. तसेच 10 हजार 785 चौकिमी क्षेत्रावर सह्याद्री-कोकण वन्यजी भ्रमणमार्गाचा विस्तार असून सह्याद्रीत मादी वाघ पिढ्यानपिढ्या प्रजनन करत असल्याची महत्त्वपूर्ण नोंद या अहवालात करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या परिषदेत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व वन्यजीव भ्रमण मार्ग क्षेत्रात आजवर अधिवास, जैवविविधता विषयक झालेल्या संशोधनांना आणि वनविभागाला एका मंचावर एकत्र आणून व्याघ्र प्रकल्पातील समृद्ध जैवविविधता, व्यवस्थापनात आवश्यक असणारे मुद्दे, भविष्यातील आव्हाने व संधी आदींविषयी उहापोह करण्यात आला.

परिषदेचे प्रास्ताविक व स्वागत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोयनाचे उपसंचालक उत्तम सावंत यांनी केले. परिषदेला सांगली उपवनसंरक्षक श्रीमती नीता कट्टे, चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या उपसंचालक श्रीमती स्नेहलता पाटील, कोल्हापूर वनवृत्तमधील वरिष्ठ अधिकारी, सह्याद्री भुप्रदेशातील सर्व मानद वन्यजीव रक्षक, विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, वन्यजीव संशोधक, निसर्गप्रेमी व विद्यार्थी उपस्थित होते.

परिषदेत महत्त्वपूर्ण संशोधन सादर : या परिषदेदरम्यान संशोधकांनी सह्याद्री लँडस्केप, गवताळ प्रदेश, सडे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधता आदींविषयांवरील संशोधन सादर केले. तसेच या संशोधनाचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनात असणारे महत्त्व व भविष्यातील संशोधनाच्या संधींची चर्चा करण्यात आली. यासोबतच, वनगस्ती आणि वनसंरक्षणामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचारी, विविध सहभागीदारांचा सन्मानही करण्यात आला.

सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गातील वाघांच्या संचाराविषयी काही महिन्यापूर्वी कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पामध्ये गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील वनधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत भ्रमणमार्गातील वाघांच्या हालचाली, संरक्षण आणि शिकारीसंदर्भात समन्वयावर आधारित चर्चा झाली. राज्यांतर्गत होणाऱ्या वाघांच्या हालचालींबाबत समन्वय साधण्यासाठी लवकरच समाजमाध्यमांवरील व्हॉट्सअॅपवर वनधिकाऱ्यांचा गट तयार करून माहितीची देवाण-घेवाण केली जाईल.

– मणिकंदन रामानुजम

(मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर -प्रादेशिक) 

The post सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गात 32 वाघांचे अस्तित्व – गिरीश पंजाबी first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/1119/feed 0
सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गात 32 वाघांचे अस्तित्व – गिरीश पंजाबी https://janswarashtra.com/archives/1107 https://janswarashtra.com/archives/1107#respond Fri, 09 Aug 2024 17:59:00 +0000 https://janswarashtra.com/?p=1107 कराडला सह्याद्री व्याघ्र भूप्रदेश संवर्धन परिषद उत्साहात कराड/प्रतिनिधी : – महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत विस्तारलेल्या सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात तब्बल 32 वाघांचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे. ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’ने कोल्हापूर वन विभाग आणि ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’च्या मदतीने तयार केलेला अहवाल या परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये कर्नाटकमधील 17 आणि गोव्यातील 5 वाघांची संख्या ही ... Read more

The post सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गात 32 वाघांचे अस्तित्व – गिरीश पंजाबी first appeared on Jan Swarashtra.

]]>
कराडला सह्याद्री व्याघ्र भूप्रदेश संवर्धन परिषद उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –

महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत विस्तारलेल्या सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात तब्बल 32 वाघांचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे. ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’ने कोल्हापूर वन विभाग आणि ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’च्या मदतीने तयार केलेला अहवाल या परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये कर्नाटकमधील 17 आणि गोव्यातील 5 वाघांची संख्या ही राष्ट्रीय व्याघ्र गणनेच्या अहवालानुसार नोंदवण्यात आली, तर पश्चिम महाराष्ट्रामधील 10 वाघांच्या छायाचित्रांची नोंद आम्ही आमच्या अभ्यासातून केल्याचे ‘डब्लूसीटी’चे वन्यजीव संशोधक गिरीष पंजाबी यांनी सांगितले.

जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून दि. 2 ऑगस्ट रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या सह्याद्री वन्यजीव संशोधन सुविधा केंद्रातर्फे आयोजित सह्याद्री व्याघ्र भूप्रदेश संवर्धन परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेत माहिती देताना ते बोलत होते.

परिषदेच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूरचे संचालक मणीकंदा रामानुजम होते. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणचे अतिरिक्त महानिरीक्षक नंदकिशोर काळे, वानिकी महाविद्यालय, दापोलीचे अधिष्ठाता डॉ. सतिश नरखेडे, कृष्णा मेडिकल महाविद्यालयाचे कुलसचिव एम. व्ही. घोरपडे होते.

सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात वावर असलेल्या वाघांच्या अस्तित्वाबाबत बोलताना वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी म्हणाले, सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात वावर असलेल्या वाघांच्या अस्तित्वाबाबत माहिती घेण्यासाठी ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’ने कोल्हापूर वन विभाग आणि ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’च्या मदतीने एक अहवाल तयार करण्यात आला होता. त्यामध्ये तब्बल 32 वाघांचा वावर असल्याचे आढळून आले आहे. तसेच 10 हजार 785 चौरस किलोमीटर क्षेत्रावर सह्याद्री-कोकण वन्यजी भ्रमणमार्गाचा विस्तार असून सह्याद्रीत मादी वाघ पिढ्यानपिढ्या प्रजनन करत असल्याची नोंद या अहवालात  करण्यात आली आहे.

Oplus_131072 

या परिषदेत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व वन्यजीव भ्रमण मार्ग क्षेत्रात आजवर अधिवास, जैवविविधता विषयक झालेल्या संशोधनांना आणि वनविभागाला एका मंचावर एकत्र आणून व्याघ्र प्रकल्पातील समृद्ध जैवविविधता, व्यवस्थापनात आवश्यक असणारे मुद्दे, भविष्यातील आव्हाने व संधी आदींविषयी उहापोह करण्यात आला.

परिषदेचे प्रास्ताविक व स्वागत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोयनाचे उपसंचालक उत्तम सावंत यांनी केले. परिषदेला सांगली उपवनसंरक्षक श्रीमती नीता कट्टे, चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या उपसंचालक श्रीमती स्नेहलता पाटील, कोल्हापूर वनवृत्तमधील वरिष्ठ अधिकारी, सह्याद्री भुप्रदेशातील सर्व मानद वन्यजीव रक्षक, विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, वन्यजीव संशोधक, निसर्गप्रेमी व विद्यार्थी उपस्थित होते.

परिषदेत महत्त्वपूर्ण संशोधन सादर : या परिषदेदरम्यान संशोधकांनी सह्याद्री लँडस्केप, गवताळ प्रदेश, सडे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधता आदींविषयांवरील संशोधन सादर केले. तसेच या संशोधनाचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनात असणारे महत्त्व व भविष्यातील संशोधनाच्या संधींची चर्चा करण्यात आली. यासोबतच, वनगस्ती आणि वनसंरक्षणामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचारी, विविध सहभागीदारांचा सन्मानही करण्यात आला.

सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गातील वाघांच्या संचाराविषयी काही महिन्यापूर्वी कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पामध्ये गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील वनधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत भ्रमणमार्गातील वाघांच्या हालचाली, संरक्षण आणि शिकारीसंदर्भात समन्वयावर आधारित चर्चा झाली. राज्यांतर्गत होणाऱ्या वाघांच्या हालचालींबाबत समन्वय साधण्यासाठी लवकरच समाजमाध्यमांवरील व्हॉट्सअॅपवर वनधिकाऱ्यांचा गट तयार करून माहितीची देवाण-घेवाण केली जाईल.

– मणिकंदन रामानुजम

(मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर-प्रादेशिक)

The post सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गात 32 वाघांचे अस्तित्व – गिरीश पंजाबी first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/1107/feed 0
सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गात 32 वाघांचे अस्तित्व -गिरीष पंजाबी https://janswarashtra.com/archives/1094 https://janswarashtra.com/archives/1094#respond Fri, 09 Aug 2024 12:09:05 +0000 https://janswarashtra.com/?p=1094 कराडला सह्याद्री व्याघ्र भूप्रदेश संवर्धन परिषद उत्साहात कराड/प्रतिनिधी : – महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत विस्तारलेल्या सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात तब्बल 32 वाघांचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे. ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’ने कोल्हापूर वन विभाग आणि ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’च्या मदतीने तयार केलेला अहवाल या परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये कर्नाटकमधील 17 आणि गोव्यातील 5 वाघांची संख्या ही ... Read more

The post सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गात 32 वाघांचे अस्तित्व -गिरीष पंजाबी first appeared on Jan Swarashtra.

]]>
कराडला सह्याद्री व्याघ्र भूप्रदेश संवर्धन परिषद उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –

महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत विस्तारलेल्या सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात तब्बल 32 वाघांचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे. ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’ने कोल्हापूर वन विभाग आणि ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’च्या मदतीने तयार केलेला अहवाल या परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये कर्नाटकमधील 17 आणि गोव्यातील 5 वाघांची संख्या ही राष्ट्रीय व्याघ्र गणनेच्या अहवालानुसार नोंदवण्यात आली, तर पश्चिम महाराष्ट्रामधील 10 वाघांच्या छायाचित्रांची नोंद आम्ही आमच्या अभ्यासातून केल्याचे ‘डब्लूसीटी’चे वन्यजीव संशोधक गिरीष पंजाबी यांनी सांगितले.

जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून दि. 2 ऑगस्ट रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या सह्याद्री वन्यजीव संशोधन सुविधा केंद्रातर्फे आयोजित सह्याद्री व्याघ्र भूप्रदेश संवर्धन परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेत माहिती देताना ते बोलत होते.

परिषदेच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूरचे संचालक मणीकंदा रामानुजम होते. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणचे अतिरिक्त महानिरीक्षक नंदकिशोर काळे, वानिकी महाविद्यालय, दापोलीचे अधिष्ठाता डॉ. सतिश नरखेडे, कृष्णा मेडिकल महाविद्यालयाचे कुलसचिव एम. व्ही. घोरपडे होते.

सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात वावर असलेल्या वाघांच्या अस्तित्वाबाबत बोलताना वन्यजीव संशोधक गिरीष पंजाबी म्हणाले, सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात वावर असलेया वाघांच्या अस्तित्वाबाबत माहिती घेण्यासाठी ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’ने कोल्हापूर वन विभाग आणि ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’च्या मदतीने एक अहवाल तयार करण्यात आला होता. त्यामध्ये सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात तब्बल 32 वाघांचा वावर असल्याचे आढळून आले आहे. तसेच 10 हजार 785 चौकिमी क्षेत्रावर सह्याद्री-कोकण वन्यजी भ्रमणमार्गाचा विस्तार असून सह्याद्रीत मादी वाघ पिढ्यानपिढ्या प्रजनन करत असल्याची महत्त्वपूर्ण नोंद या अहवालात करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या परिषदेत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व वन्यजीव भ्रमण मार्ग क्षेत्रात आजवर अधिवास, जैवविविधता विषयक झालेल्या संशोधनांना आणि वनविभागाला एका मंचावर एकत्र आणून व्याघ्र प्रकल्पातील समृद्ध जैवविविधता, व्यवस्थापनात आवश्यक असणारे मुद्दे, भविष्यातील आव्हाने व संधी आदींविषयी उहापोह करण्यात आला.

परिषदेचे प्रास्ताविक व स्वागत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोयनाचे उपसंचालक उत्तम सावंत यांनी केले. परिषदेला सांगली उपवनसंरक्षक श्रीमती नीता कट्टे, चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या उपसंचालक श्रीमती स्नेहलता पाटील, कोल्हापूर वनवृत्तमधील वरिष्ठ अधिकारी, सह्याद्री भुप्रदेशातील सर्व मानद वन्यजीव रक्षक, विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, वन्यजीव संशोधक, निसर्गप्रेमी व विद्यार्थी उपस्थित होते.

परिषदेत महत्त्वपूर्ण संशोधन सादर : या परिषदेदरम्यान संशोधकांनी सह्याद्री लँडस्केप, गवताळ प्रदेश, सडे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधता आदींविषयांवरील संशोधन सादर केले. तसेच या संशोधनाचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनात असणारे महत्त्व व भविष्यातील संशोधनाच्या संधींची चर्चा करण्यात आली. यासोबतच, वनगस्ती आणि वनसंरक्षणामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचारी, विविध सहभागीदारांचा सन्मानही करण्यात आला.

सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गातील वाघांच्या संचाराविषयी काही महिन्यापूर्वी कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पामध्ये गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील वनधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत भ्रमणमार्गातील वाघांच्या हालचाली, संरक्षण आणि शिकारीसंदर्भात समन्वयावर आधारित चर्चा झाली. राज्यांतर्गत होणाऱ्या वाघांच्या हालचालींबाबत समन्वय साधण्यासाठी लवकरच समाजमाध्यमांवरील व्हॉट्सअॅपवर वनधिकाऱ्यांचा गट तयार करून माहितीची देवाण-घेवाण केली जाईल.

– मणिकंदन रामानुजम

(मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर-प्रादेशिक)

The post सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गात 32 वाघांचे अस्तित्व -गिरीष पंजाबी first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/1094/feed 0
सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गात 32 वाघांचे अस्तित्व – गिरीष पंजाबी https://janswarashtra.com/archives/1091 https://janswarashtra.com/archives/1091#respond Fri, 09 Aug 2024 11:55:30 +0000 https://janswarashtra.com/?p=1091   सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गात 32 वाघांचे अस्तित्व – गिरीष पंजाबी कराडला सह्याद्री व्याघ्र भूप्रदेश संवर्धन परिषद उत्साहात कराड/प्रतिनिधी : – महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत विस्तारलेल्या सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात तब्बल 32 वाघांचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे. ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’ने कोल्हापूर वन विभाग आणि ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’च्या मदतीने तयार केलेला अहवाल या परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला. ... Read more

The post सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गात 32 वाघांचे अस्तित्व – गिरीष पंजाबी first appeared on Jan Swarashtra.

]]>
 
सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गात 32 वाघांचे अस्तित्व – गिरीष पंजाबी

कराडला सह्याद्री व्याघ्र भूप्रदेश संवर्धन परिषद उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –

महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत विस्तारलेल्या सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात तब्बल 32 वाघांचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे. ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’ने कोल्हापूर वन विभाग आणि ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’च्या मदतीने तयार केलेला अहवाल या परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये कर्नाटकमधील 17 आणि गोव्यातील 5 वाघांची संख्या ही राष्ट्रीय व्याघ्र गणनेच्या अहवालानुसार नोंदवण्यात आली, तर पश्चिम महाराष्ट्रामधील 10 वाघांच्या छायाचित्रांची नोंद आम्ही आमच्या अभ्यासातून केल्याचे ‘डब्लूसीटी’चे वन्यजीव संशोधक गिरीष पंजाबी यांनी सांगितले.

जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून दि. 2 ऑगस्ट रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या सह्याद्री वन्यजीव संशोधन सुविधा केंद्रातर्फे आयोजित सह्याद्री व्याघ्र भूप्रदेश संवर्धन परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेत माहिती देताना ते बोलत होते.

परिषदेच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूरचे संचालक मणीकंदा रामानुजम होते. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणचे अतिरिक्त महानिरीक्षक नंदकिशोर काळे, वानिकी महाविद्यालय, दापोलीचे अधिष्ठाता डॉ. सतिश नरखेडे, कृष्णा मेडिकल महाविद्यालयाचे कुलसचिव एम. व्ही. घोरपडे होते.

सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात वावर असलेल्या वाघांच्या अस्तित्वाबाबत बोलताना वन्यजीव संशोधक गिरीष पंजाबी म्हणाले, सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात वावर असलेल्या वाघांच्या अस्तित्वाबाबत माहिती घेण्यासाठी ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’ने कोल्हापूर वन विभाग आणि ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’च्या मदतीने एक अहवाल तयार करण्यात आला होता. त्यामध्ये सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात तब्बल 32 वाघांचा वावर असल्याचे आढळून आले आहे. तसेच 10 हजार 785 चौकिमी क्षेत्रावर सह्याद्री-कोकण वन्यजी भ्रमणमार्गाचा विस्तार असून सह्याद्रीत मादी वाघ पिढ्यानपिढ्या प्रजनन करत असल्याची महत्त्वपूर्ण नोंद या अहवालात करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या परिषदेत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व वन्यजीव भ्रमण मार्ग क्षेत्रात आजवर अधिवास, जैवविविधता विषयक झालेल्या संशोधनांना आणि वनविभागाला एका मंचावर एकत्र आणून व्याघ्र प्रकल्पातील समृद्ध जैवविविधता, व्यवस्थापनात आवश्यक असणारे मुद्दे, भविष्यातील आव्हाने व संधी आदींविषयी उहापोह करण्यात आला.

परिषदेचे प्रास्ताविक व स्वागत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोयनाचे उपसंचालक उत्तम सावंत यांनी केले. परिषदेला सांगली उपवनसंरक्षक श्रीमती नीता कट्टे, चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या उपसंचालक श्रीमती स्नेहलता पाटील, कोल्हापूर वन वृत्तमधील वरिष्ठ अधिकारी, सह्याद्री भुप्रदेशातील सर्व मानद वन्यजीव रक्षक, विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, वन्यजीव संशोधक, निसर्गप्रेमी व विद्यार्थी उपस्थित होते.

परिषदेत महत्त्वपूर्ण संशोधन सादर

या परिषदेदरम्यान संशोधकांनी सह्याद्री लँडस्केप, गवताळ प्रदेश, सडे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधता आदींविषयांवरील संशोधन सादर केले. तसेच या संशोधनाचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनात असणारे महत्त्व व भविष्यातील संशोधनाच्या संधींची चर्चा करण्यात आली. यासोबतच, वनगस्ती आणि वनसंरक्षणामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचारी, विविध सहभागीदारांचा सन्मानही करण्यात आला.

सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गातील वाघांच्या संचाराविषयी काही महिन्यापूर्वी कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पामध्ये गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील वनधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत भ्रमणमार्गातील वाघांच्या हालचाली, संरक्षण आणि शिकारीसंदर्भात समन्वयावर आधारित चर्चा झाली. राज्यांतर्गत होणाऱ्या वाघांच्या हालचालींबाबत समन्वय साधण्यासाठी लवकरच समाजमाध्यमांवरील व्हॉट्सअॅपवर वनधिकाऱ्यांचा गट तयार करून माहितीची देवाण-घेवाण केली जाईल.

– मणिकंदन रामानुजम

(मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर-प्रादेशिक)

The post सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गात 32 वाघांचे अस्तित्व – गिरीष पंजाबी first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/1091/feed 0