कराड/प्रतिनिधी : –
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजप सातारा जिल्हा व कराड दक्षिण मंडलच्यावतीने मलकापूर, ता. कराड येथे भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली मोठ्या उत्साहात पार पडली. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मलकापूर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
उद्देश : हातात तिरंगा घेऊन “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” अशा घोषणांसह देशभक्तीपर गाणी व घोषवाक्यांनी वातावरण भारावून गेले. स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण आणि नव्या पिढीला देशसेवेची प्रेरणा देणे हा या रॅलीचा उद्देश असल्याचे आमदार डॉ. भोसले यांनी सांगितले.
राष्ट्रीय ऐक्याचा संदेश : रॅलीदरम्यान मलकापूरातील विविध मार्गांवरून फेरी काढत राष्ट्रीय ऐक्याचा संदेश देण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमास भाजप राज्य परिषद सदस्य संजय पवार, हर्षवर्धन मोहिते, कराड दक्षिण मंडल अध्यक्ष राजेंद्र यादव, युवा मोर्चा पदाधिकारी सुरज शेवाळे, शंकर निकम, प्रवीण साळुंखे, माजी तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, माजी नगरसेवक दिनेश रैनाक, सामाजिक कार्यकर्ते राजू मुल्ला, सुहास कदम, हणमंतराव जाधव, सूर्यकांत खिलारे, आण्णासो काशिद, तानाजी देशमुख, प्रमोद पाटील, डॉ. सारिका गावडे, आनंदी शिंदे, पंकज पाटील, चंद्रकांत लाखे, भारत जंत्रे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
