शिक्षकांनी निवृत्तीनंतरही शिक्षण क्षेत्रात योगदान द्यावे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

अनिस नायकवडी; मोहनराव सातपुते यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार

कराड/प्रतिनिधी : –

शिक्षक हा कधीच निवृत्त होत नसतो. शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे काम शिक्षक करतात. गेली ३८ वर्षांपासून मोहनराव सातपुते यांनी शाळेत एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून काम केले आहे. शिक्षक पेशाबरोबरच शिक्षक संघटना व सामाजिक क्षेत्रातील सातपुते सरांचे काम उल्लेखनीय आहे. मोहनराव सातपुते यांच्यासह अन्य शिक्षकांनीही निवृत्तीनंतरही शिक्षण क्षेत्रात योगदान द्यावे, असे मत सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी व्यक्त केले.

सेवापूर्ती सत्कार : नांदलापूर, ता. कराड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक मोहनराव सातपुते यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ कार्यक्रमात नायकवडी बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे होते.

प्रमुख उपस्थिती : कार्यक्रमास कराडचे आर.टी.ओ. चैतन्य कणसे, शालेय पोषण आहार अधीक्षक विजय परिट, शिक्षणविस्तार अधिकारी जमिला मुलाणी, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे, कोल्हापूर जिल्हा शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तोडकर, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य संजय पवार, उपसरपंच मानसिंग लावंड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

समाजकार्यात योगदान द्यावे: गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे म्हणाले, मोहन सातपुते हे आदर्श शिक्षक आहेत. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी समाजकार्यात योगदान द्यावे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले आहे. त्यांचे शिकवण्याचे आणि विद्यार्थ्यांशी बोलण्याचे अनोखे कौशल्य नेहमीच वाखाणण्याजोगे राहिले आहे.

मान्यवरांची उपस्थिती : शिक्षक बँकेचे संचालक किरण यादव, विशाल कणसे, नितीन, शिक्षक बँकेचे संचालक नवनाथ जाधव, विजय बनसोडे, केंद्रप्रमुख गणेश जाधव, शिक्षक समितीचे अध्यक्ष अरुण पाटील, शिक्षक संघाचे नेते प्रदीप घाडगे, मलकापूर रोटरीचे अध्यक्ष राहुल जामदार, विलासराव पवार, सलीम मुजावर, रेठरे सोसायटीचे चेअरमन व्ही.के. मोहिते, संतोष मांढरे, संजय नांगरे, सुभाष शेवाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

भाषणे : कार्यक्रमावेळी अंकुश नांगरे, गणेश जाधव, विश्वंभर रणनवरे, संजय पवार, डोईफोडे आदींसह  विविध मान्यवरांची भाषणे झाली. मान्यवरांच्या हस्ते सातपुते यांचा सेवापूर्तीनिमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक नारायण सातपुते, सूत्रसंचालन रामभाऊ सातपुते, स्वागत अंकुश नांगरे, पांडुरंग माने यांनी आभार मानले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!