सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ हंगामासाठी मिल रोलर पूजन समारंभ राज्याचे माजी सहकार पणन मंत्री, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील, व्हाईस चेअरमन कांतीलाल भोसले-पाटील आणि नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुकताच संपन्न झाला.
श्री गणेश पूजन : यावेळी संचालक संतोष घार्गे, संजय गोरे आणि संजय कुंभार यांच्या हस्ते श्री गणेश पूजन करण्यात आले.
२०,२०३ हेक्टर ऊसाची नोंद : येत्या सन २०२५-२६ गळीत हंगामासाठी मशिनरी ओव्हरहॉलिंगची कामे गतीने सुरू आहेत. यंदाच्या हंगामासाठी कारखान्याकडे २०,२०३ हेक्टर क्षेत्रावरील ऊसाची नोंद गळीतासाठी झालेली आहे. ऊस तोडणी व वाहतुक उभारणीसाठी करार करण्याचे काम सुरू आहे.
आवाहन : कारखान्याचे सर्व सभासद व बिगर सभासद यांनी त्यांनी पिकविलेला व कारखान्याकडे नोंदविलेला सर्व ऊस कारखान्याकडे गळीतासाठी द्यावा, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन माननीय श्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
कारखाना कार्यस्थळावर मोफत साखर : यावेळी कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी, कारखान्याच्या सभासदांना, त्यांनी धारण केलेल्या प्रति शेअरला वार्षिक ६० किलो साखर मोफत देण्याच्या घोषणेनुसार १ एप्रिल २०२५ पासून, सभासदांना त्यांचे मागणी व गरजेनुसार कारखाना कार्यस्थळावरील सभासद साखर दुकानात मोफत साखर देण्यात येत असल्याचे सांगितले.
दिपावली सणापूर्वी सभासदांना साखर गांव पोहोच देणार : सभासद साखर कार्डवर शिल्लक असणारी संपूर्ण साखर दिपावली सणापूर्वी सभासदांना गांव पोहोच देण्यात येणार आहे, असे सांगून नोंदविलेला संपूर्ण ऊस सह्याद्रि कारखान्याकडे गळीतास पाठवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.