विद्यार्थिप्रिय शिक्षक हे समाजाचे भूषण

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आमदार मनोज घोरपडे; मोहन जाधव यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

कराड/प्रतिनिधी : –

विद्यार्थिप्रिय शिक्षक हे समाजाचे भूषण असतात. असे शिक्षक समाजाच्या मनात कायमच आदराचे स्थान निर्माण करतात, असे मत कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी व्यक्त केले.

सेवानिवृत्ती कार्यक्रम : नागठाणे नंबर दोन (ता. सातारा) येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक मोहन जाधव यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ॲड. धनाजी जाधव, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र घोरपडे, शिक्षक नेते मोहनराव जाधव, विस्तार अधिकारी शशिकला जगताप, केंद्रप्रमुख नारायण बागल, अनिल चव्हाण, विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सुरेश पाटील आदींची उपस्थिती होती.

शैक्षणिक कार्य प्रेरणादायी : आमदार घोरपडे म्हणाले, कर्तव्य भावना, सचोटी, सेवाभावी वृत्ती, वक्तशीरपणा हे गुण शिक्षकाला वेगळी ओळख प्राप्त करून देतात. या बळावर मोहन जाधव यांनी केलेले शैक्षणिक कार्य प्रेरणादायी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

विशेष सत्कार : विजय देशमुख यांनी प्रास्ताविक केले. धैर्यशील जाधव यांनी स्वागत केले. बाळासाहेब चव्हाण यांनी आभार मानले. अलका साबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमात मोहन जाधव यांचा आमदार मनोजदादा यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!