शिबिराचे तिसरे वर्ष; आतापर्यंत शेकडो दात्यांनी बजावला हक्क, सहभागी होण्याचे आवाहन
कराड/प्रतिनिधी : –
हिंदवी स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आज बुधवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कृष्णा हॉस्पिटल रक्तदान विभाग, कराड (मलकापूर) येथे सकाळी १० ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर होणार आहे.
‘शंभूतीर्थ ब्लड ग्रुप’ : “स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती कराड तालुका” संचलित ‘शंभूतीर्थ ब्लड ग्रुप’ या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त दरवर्षी भव्य रक्तदान शिबिराच्या आयोजन करण्यात येते.
शिबिराचे तिसरे वर्ष : यावर्षीचे हे तिसरे वर्ष आहे. आतापर्यंत या ग्रुपच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. युवक, महिला,तरुण, नागरिक, तसेच महिलांनी रक्तदानासारखे पवित्र कर्तव्य बजावून गरजू रुग्णांना, त्याचबरोबर त्यांच्या नातेवाईकांना मोलाची मदत केली आहे.
गरजूंना तात्काळ मदत : शिबिरात जमलेल्या रक्ताच्या पिशव्या कृष्णा हॉस्पिटल रक्तदान विभागास देण्यात येतात. तसेच ज्या गरजू रुग्णांना रक्ताची गरज आहे, त्यांना रक्तदात्यांमार्फत, तसेच शिबिरात याआधी केलेल्या रक्तदात्यांचे कार्ड दिले जाते. हे कार्ड कृष्णा हॉस्पिटलमध्ये ग्राह्य धरण्यात येते. त्यामुळे गरजू रुग्णांना तत्काळ मदत होते. त्यामुळे या ग्रुपच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
वेळ व ठिकाण : यावर्षी आज बुधवार (दि. १४) मे रोजी कृष्णा हॉस्पिटल रक्तदान विभाग, कराड (मलकापूर) येथे सकाळी १० ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर होणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त युवक, नागरिक, महिलांनी उत्स्फुर्तपणे रक्तदानाचे पवित्र कर्तव्य बजावून गरजूंना सहकार्य करावे, असे आवाहन स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती, कराड तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नाव नोंदणी : या शिबिरात सहभागी होण्यासाठी स्मारक समितीचे संस्थापक सचिव रणजीत पाटील (नाना) 9922750444, विश्वस्त.. प्रताप इंगवले 9960363250, सुनील शिंदे 7798691999, सचिन वास्के 9766458486, सचिन राऊत 9373119009 यांच्याशी संपर्क करून नाव नोंदणी करावी, असे आवाहनही करण्यात आले. आहे.
‘शंभूतीर्थ ब्लड ग्रुप’ या व्हाट्सअप माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिराचे हे तिसरे वर्ष आहे. यामध्ये आतापर्यंत शेकडो दात्यांनी रक्तदान करून अनेक गरजूंना मुलाची मदत केली आहे. यावर्षीही रक्त दात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा.
– सुनील शिंदे (‘शंभूतीर्थ ब्लड ग्रुप’, कराड)
