‘सह्याद्रि’साठी 234 उमेदवारांचे 251 अर्ज

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

शेवटच्या दिवशी 157 अर्ज दाखल; 6 मार्चला अर्जांची छाननी 

कराड/प्रतिनिधी : – 

यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणुकीसाठी बुधवार (दि. 5) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसअखेर 157 उमेदवारी अर्ज दाखल झाले. 21 जागांसाठी होणार्‍या या निवडणुकीसाठी आजअखेर 234 उमेदवारांचे एकूण 251 अर्ज दाखल झाले आहे.

गट/मतदारसंघ निहाय दाखल झालेले अर्ज : सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीसाठी गट/मतदारसंघ निहाय दाखल झालेले उमेदवारी अर्ज पुढील प्रमाणे- गट क्रमांक 1 – कराड मधून एकूण 14 उमेदवारांचे 18  अर्ज दाखल झाले आहेत. गट क्रमांक 2- तळबीड 32 उमेदवारांचे 34 अर्ज,   गट क्रमांक 3- उंब्रज 30 उमेदवारांचे 31 अर्ज, गट क्रमांक 4- कोपर्डे हवेली 46 उमेदवारांचे 49 अर्ज, गट क्रमांक 5- मसूर 40 उमेदवारांचे 42 अर्ज. गट क्रमांक 6- वाठार किरोली  28 उमेदवारांचे 33 अर्ज, अ. जा. /अ. ज. राखीव – 9 उमेदवारांचे अर्ज व महिला राखीव – 14 उमेदवारांचे 14 अर्ज दाखल झाले आहेत. तसेच इ.मा.व. राखीव मधून 11 उमेदवारांचे 11 अर्ज दाखल झाले आहेत. वि. जा. /भ.ज./वि.मा.वर्ग राखीव मधून 10 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे पाच दिवसांत 234 उमेदवारांचे 251 अर्ज दाखल झाले आहेत. दि. 6 मार्च रोजी सकाळी 11 वाजल्यापासून निवडणूक अधिकारी यांचे कार्यालयात दाखल अर्जांची छाननी होणार आहे. सदर छाननी गट निहाय क्रमवारीनुसार होणार आहे. महिला राखीव, अज/अजा, इमाव व विजा/भज/वि.मा.व या राखीव मतदार संघातील दाखल अर्जांची छाननी त्याचप्रमाणे करण्यात येणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी : या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निबंधक संजयकुमार सुद्रिक, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक राहूल देशमुख, संजय जाधव, उपनिबंधक अपर्णा यादव काम पहात आहेत. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!