अहिल्यादेवी बँकेच्या कराड शाखेचा सोमवारी शुभारंभ

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

महाव्यवस्थापक हेमंत तुपे यांची माहिती; प. पु. शिवयोगी विजयलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते उद्घाटन

कराड/प्रतिनिधी : –

अहिल्यादेवी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सोलापूरच्या कराड शाखेचा शुभारंभ सोमवार (दि. १७) फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता समर्थ प्राईड, शाहू चौक, कराड येथे संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे महाव्यवस्थापक हेमंत तुपे यांनी दिली.

पत्रकार परिषद : नूतन कराड शाखेच्या शुभारंभ कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच याप्रसंगी श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले असून, सर्व हितचिंतकांनी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी बँकेच्यावतीने केले. यावेळी चंद्रकांत चव्हाण यांची उपस्थिती होती.

मान्यवर : या शुभारंभ समारंभास श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट, पुसेगावचे मठाधिपती गुरुवर्य १०८ प. पु. श्रीमहंत सुंदरगिरीजी महाराज यांच्या हस्ते पूजन होणार आहे. तसेच महालिंगेश्वर मठ संस्थान, करवडीचे प. पु. शिवयोगी विजयलिंग शिवाचार्य महाराजयांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

उपस्थिती : याप्रसंगी अहिल्यादेवी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष अॅड. जनार्दन बोत्रे, तसेच संचालक, सल्लागार, ठेवीदार, खातेदार, अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित राहणार आहेत.

मार्गदर्शक : अहिल्यादेवी बँकेचे कामकाज शिवसमर्थ परिवाराचे कुटुंबप्रमुख अॅड. जनार्दन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार असल्याचेही श्री तुपे यांनी यावेळी सांगितले.

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!