कराड/प्रतिनिधी : –
‘आम्ही पुणेकर’ या संस्थेमार्फत इंडो जपान या मोहिमेंतर्गत काढण्यात आलेल्या शिव रथयात्रेचे शुक्रवारी कराडमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. येथील हॉटेल पंकज येथे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
मान्यवर : यावेळी भाजपचे कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्यासह शहर भाजपचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक व हिंदुत्व प्रेमी उपस्थित होते.
अभिवादन : ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेमार्फत इंडो जपान या मोहिमेंतर्गत हेमंत जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची शिव रथयात्रा काढली आहे. मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, मालवण, बेंगलोर, नागपूर, ग्वाल्हेर, दिल्ली अशा ठिकाणांहून आणि महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांतून ही रथयात्रा प्रवास करत असून या रथयात्रेचे ठिकठिकाणी जंगी स्वागत होत आहे. त्यानुसार शुक्रवारी या शिव रथयात्रेचे कराडमध्ये आगमन झाले. याप्रसंगी येथील हॉटेल पंकज येथे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
स्वागत व शुभेच्छा : या रथयात्रेचे आयोजक हेमंत जाधव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे स्वागत करून त्यांच्या या उपक्रमास आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासह उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.
