कराड भारतीय जनता पार्टीतर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची 194 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी स्त्री शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी जगभरातील महिलांसमोर एक आदर्श निर्माण केला असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
अभिवादन : यावेळी भाजप अनुसुचित मोर्चाचे अध्यक्ष विवेक भोसले, कराड शहरचे सचिव चेतन थोरवडे यांनी कराड भारतीय जनता पार्टीतर्फे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
मान्यवर : यावेळी शहराध्यक्ष एकनाथ बागडी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष सागर लादे, रुपेश मुळे, सरचिटणीस विश्वनाथ फुटाणे, प्रितेश मेहता, सोपान तावरे, केतन शाह, अनिकेत वास्के, घार्गे पाटील, अभिषेक भोसले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.