विजय दिवस समारोह 2024; विद्यार्थी नागरिकांचा मोठा प्रतिसाद
कराड/प्रतिनिधी : –
विजय दिवस समारोह सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेल्या शस्त्रास्त्र प्रदर्शनास कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथे सोमवारी दुपारी प्रारंभ करण्यात आला. शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे उदघाटन कर्नल पाटील यांच्या उपस्थितीत झाले.
मान्यवरांची उपस्थिती : सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, विजय दिवस समितीचे सचिव अॅड. संभाजीराव मोहिते, विजय दिवस समीतीचे संचालक सलीम मुजावर, प्रा. बी. एस. खोत, रमेश पवार, मोहनराव डोळ, जयवंतराव मोहिते, श्री. मगरे, सैन्यदलातील निवृत्त अधिकारी काटेकर आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसह नागरिकांची गर्दी : शस्त्रास्त्र पाहण्यासाठी शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनाही प्रदर्शन पाहण्यासाठी आणण्यात आले होते.












