दिव्यांग रोटरी महाशिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

302 रुग्णांची तपासणी; 254 रुग्णांना मिळणार मोफत साहित्य

कराड/प्रतिनिधी : –

रोटरी क्लब ऑफ कराड, मलकापूर, पाटण आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मोफत दिव्यांग रोटरी महाशिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये 302 रुग्णांची तपासणी करण्यात आले असून 254 रुग्णांना मोफत साहित्य वाटप करण्यात येणार आहे.

दोन दिवसीय शिबिर : जुने कृष्णाबाई मंगल कार्यालय येथे रविवार, दि. 1 व सोमवार, दि. 2 अशा दोन दिवस चाललेल्या या मोफत तपासणी शिबिरात मुंबईहून आलेल्या तज्ज्ञ टीमच्या माध्यमातून 302 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 254 रुग्णांची निवड करण्यात आली असून त्यांना साहित्यांचे एक ते दीड महिन्यांत मोफत वाटप करण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी रुग्णांची तपासणी, निवड आणि त्याचे मोजमाप यासंबंधीचे नियोजन प्रभावी होते. संभाजीनगर, भुदरगड, निपाणी, पाटण, सातारा, वैभववाडी अशा अनेक ठिकाणांहून आलेल्या रुग्णांनी रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

सर्व सदस्यांचे परिश्रम : या प्रकल्पासाठी रोटरी क्लब ऑफ कराड, रोटरी क्लब ऑफ मलकापूर, रोटरी क्लब ऑफ पाटणचे सर्व पदाधिकारी, प्रकल्प समन्वयक कराडचे शिवराज माने, सुनील चाळके, डॉ.शेखर कोगणूळकर, प्रकल्प प्रमुख शशांक पालकर, चंद्रकुमार डांगे, प्रबोध पुरोहित, जगदीश वाघ, डॉ.अनिल हुद्देदार, विनायक राऊत, गजानन कुसूरकर, रोटरी क्लब ऑफ मलकापूर अध्यक्ष चंद्रशेखर दोडमनी, सचिव विकास थोरात, सलीम मुजावर, भगवान मुळीक, रोटरी क्लब ऑफ पाटण अध्यक्ष संजीव चव्हाण, सचिव शिला पाटणकर आदीसह तिन्ही रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

सामाजिक एकोपा, परोपकार व एकजुटीचा संदेश : रोटरी क्लबने या प्रकल्पाद्वारे केवळ दिव्यांग व्यक्तींना सहाय्य दिले नाही, तर सामाजिक एकोपा, परोपकार आणि एकजुटीचा संदेशही दिला आहे. अशा प्रकारचे उपक्रम समाजात सकारात्मकता निर्माण करून गरजवंतांना आत्मसन्मानाने उभे राहण्याची संधी देतात. त्यामुळे रोटरीचा हा प्रकल्प सामाजिक सेवेमध्ये मैलाचा दगड ठरला आहे.

आभार  : या शिबिरासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे रोटरी क्लब ऑफ कराडचे अध्यक्ष रामचंद्र लाखोले, सचिव आनंदा थोरात, डायरेक्टर कॅम्युनिटी सर्विस हेल्थ डॉ.भाग्यश्री पाटील, प्रोजेक्ट चेअरमन शशांक पालकर व चंद्रकुमार डांगे यांनी आभार मानले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!