आमदार डॉ. अतुल भोसले; यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन
कराड/प्रतिनिधी : –
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाला स्व. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा लाभला असून त्यांनी राज्याला सुसंस्कृत राजकारणाचा विचार दिला. त्याच यशवंत विचारांना अनुसरून यापुढे काम करणार असून सर्वसामान्य जनतेच्या फायद्याच्या दृष्टीने चांगले, सुसंस्कृत राजकारण करण्यासाठी आपण सज्ज झालो असल्याचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली.












