सतेज ऊर्फ बंटी पाटील; मलकपुरला जाहीर सभा
कराड/प्रतिनिधी : –
चांदा ते बांदा पृथ्वीराजबाबांचे कर्तृत्व सर्वश्रुत आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात स्वतःचे घर भरले नाही. दुसऱ्या बाजूला पैशाचा पाऊस पाडणारे नेतृत्व आहे. परंतु, कराडच्या भूमीला मोठे करणे, तुमची सेवा करणे हे पृथ्वीराजबाबांचे उद्दिष्ट आहे. त्यांच्या एकनिष्ठतेचे फळ आपण त्यांना देऊया, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी केले.
प्रचार सभा : मलकापूर, (ता. कराड) येथे राष्ट्रीय महाविकास आघाडीतर्फे काँगेसचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण, अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, मनोहर शिंदे, अजितराव पाटील – चिखलीकर, बंडानाना जगताप, प्रा. धनाजी काटकर, इंद्रजित चव्हाण, नितीन काशिद, नीलम येडगे, शंकरराव खबाले, नामदेव पाटील, अॅ ड. नरेंद्र नांगरे – पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पृथ्वीराजबाबांना महाराष्ट्राच्या नकाशावर झळकवा : कराड दक्षिणच्या जनेतेने पुन्हा पृथ्वीराजबाबांना महाराष्ट्राच्या नकाशावर झळकले पाहिजेत, असे सांगून आ. सतेज पाटील म्हणाले, कोणत्याही आमिषांना बळी न पडता बाबांना निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.













