संग्राम घोरपडे; राजेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनोज घोरपडे यांना पाठिंबा
कराड/प्रतिनिधी : –
कराड उत्तरमधील उंब्रज ही मोठी बाजारपेठ आहे. याठिकाणी कराडप्रमाणे पारदर्शक उड्डाणपूल झाल्यास बाजारपेठेला मोठी चालना मिळणार आहे. यासाठी मनोजदादा आग्रही असून उंब्रजला पारदर्शक उड्डाणपूलच होईल, अशी ग्वाही संग्राम घोरपडे यांनी दिली.
राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता मेळावा :
उंब्रज, ता. कराड येथे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार मनोज घोरपडे यांच्या समर्थनार्थ राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रारंभी करणाऱ्या अनेक गणेश व नवरात्रोत्सव मंडळांनी मनोजदादा घोरपडे यांना जाहीर पाठिंबा दिला.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी तानाजी जाधव, दिलीप जाधव, विश्वास काळभोर, मीनाक्षीताई पोळ, जयवंत जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकप्रतिनिधींनी ठेकेदाराचे मांडलिकत्व घेतलेय का? :उंब्रजमधील नागरिकांची मागणी काय आहे, याची जाणीव लोकप्रतिनिधींना असायला हवी, असे सांगत श्री. घोरपडे म्हणाले, पारदर्शक पुलाची बघणे योग्य असताना या ठिकाणी मंजुरीप्रमाणेच पुल झाला पाहिजे, असे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. मग त्यांनी कोणत्या ठेकेदाराचे मांडलिकत्व घेतले आहे का? असा आरोप करत तुम्हाला ठेकेदार नव्हे; तर येथील जनता निवडून देते. उंब्रजकरांनीही त्यांना आतापर्यंत मोठी मदत केली असताना त्यांनी लोकांच्या समस्यांचा पाठपुरावा करायला हवा होता. असे त्यांनी यावेळी सांगितले.
आंदोलनात मनोजदादांचा सहभाग :पारदर्शक उड्डाणपुलासाठी उंब्रजसह परिसरातील नागरिक, व्यापाऱ्यांनी मोठ्या आंदोलन उभारले. मनोजदादांनीही भाग घेतला होता, असे सांगत श्री. घोरपडे म्हणाले, मनोजदादांनी उड्डाणपुलासाठी नितीन गडकरी, त्याचबरोबर दिल्ली मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला आहे. सध्या विधानसभा निवडणुकीचे आचारसंहिता आहे. मात्र, आचारसंहितेनंतर 100 टक्के हा प्रश्न निकाली निघणार आहे. आपणा सर्वांचे मनोजदादांना सहकार्य राहणार असून मनोजदादाही आपणा सर्वांच्या ऋणात राहतील, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
उंब्रजकर मनोजदादांच्या पाठीशी
मनोजदादा घोरपडे यांच्यासारखे शांत, संजीवनी नेतृत्व कराड उत्तरला मिळाले आहे. येथील पारदर्शक उडणपलासाठीही ते प्रयत्नशील आहे. मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांसाठी 24 तास उपलब्ध राहणारे आमदार म्हणून मनोज घोरपडे कार्यरत राहणार असून उंब्रजची जनता मनोजदादांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केला.